ब्रिसबेन : अॅशेस मालिका (Ashes Series) पहिल्याच कसोटीच्या पहिल्याच चेंडूपासूनच अॅक्शन मोडमध्ये आली आहे. गाबा कसोटीत इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक (Joe Root) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय इंग्लंडवरच उलटा पडला. इंग्लंडची पहिल्या चेंडूपासून लागलेली गळती निम्मा संघ माघारी गेला तरी थांबली नाही. (AUS vs ENG)
सामन्याचे पहिलेच षटक टाकरणाऱ्या मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) सलामीवीर रोरी बर्न्सच्या (Rory Joseph Burns) लेग स्टम्पवर यॉर्कर लेंथवर चेंडू टाकला. रोरी बर्न्सने आपल्या खास शैलीत तो पाय क्रॉस टाकत मारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्टार्कच्या स्विंग होणाऱ्या चेंडूने त्याला चकवा दिला. चेंडू स्विंग होत स्टम्पवर आदळला आणि बर्न्स पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनच्या रस्त्याला लागला.
अॅशेस मालिकेत पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा रोरी बर्न्स (Rory Joseph Burns) हा काही पहिलाच फलंदाज नाही. यापूर्वी 1936 ला अॅशेस मालिकेच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा विक्रम स्टॅन वर्थईंग्टन यांच्या नावावर नोंदावला गेला आहे.
अॅशेसमध्ये सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याची किमया ही चौथ्यांदा झाली आहे. यापूर्वी आर्थर कॉनिगम यांनी 1894 मध्ये पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती. त्यानंतर 19216 ला मॉरिस टेट यांनी आणि 1936 मध्ये मॅकॉर्मिक यांनीही सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. आता 2021 मध्ये मिशेल स्टार्कने (Mitchell Starc) बर्न्सचा पहिल्याच चेंडूवर त्रिफळा उडवत या यादीत आपले नाव नोंदवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.