Australia vs England, 5th Test: होबार्टच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यातही इंग्लंडची फलंदाजी कोलमडली. इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 188 धावांत आटोपला. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 46 चेंडूत 34 धावा करुन त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. त्याने आपल्या खेळीत तीन खणखणीत चौकारही लगावले.
ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सनं रुटला LBW च्या रुपात आउट केलं. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 24 व्या षटकात रूटने आपली विकेट गमावली. पॅट कमिन्सनं सापळा रचून रुटची शिकार केली. ऑस्ट्रेलियन कर्णधाराने पहिला चेंडू फुल लेंथ टाकल्यानंतर दुसरा चेंडू आखूड टप्प्यावर फेकत जो रुटला संभ्रमात टाकले. तिसरा चेंडूही तसाच टाकला. आणि मग चौथ्या चेंडूवर पायचित होऊन परतला.
पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 303 धावा केल्या आहेत. त्यांनी ट्रेविस हेडने 101 आणि कॅमरून ग्रीनने 74 धावांची खेळी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 188 धावांत आटोपले आहे. 113 धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे.
इंग्लंडचा पहिला डाव
संपूर्ण मालिकेत इंग्लंडच्या फलंदाजांनी निराश केल्याचे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा त्यांचा फ्लोप शो पाहायला मिळाला. सलामीवीर रॉरी बर्न्सला खातेही उघडता आले नाही. झॅक क्राउले 18, डेविड मलान 25, रुट 34, स्टोक्स 4, ओली पोप्स 14, बिलिंग्स 29, ख्रिस वोक्स36, मार्क वूड 16 धावा करुन तंबूत परतले. ब्रॉडला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडच्या संघाने पहिल्या तीन सामन्यात सलग तीन पराभवामुळे मालिका आधीच गमावली आहे. चौथ्या कसोटी अनिर्णत राखण्यात त्यांना यश आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.