Ashes : भारताने जे करुन दाखवले ते इंग्लंडला जमलेच नाही!

भारताने करुन दाखवले इंग्लंडवाले फक्त बोलले
ashes test series
ashes test series esakal
Updated on

ब्रिसबेन : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत (Ashes Test Series) गाबा कसोटी (Gabba Test) सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचे खेळाडू भारताचा (Team India) दाखला देत ऑस्ट्रेलियाला (Australia) आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अॅशेस मालिकेतील पहिल्याच गाबा कसोटीत (Gabba Test) इंग्लंडचा दारुन पराभव झाला. त्यामुळे भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा गाबा स्टेडियमवर पराभव करणे इंग्लंडला काही जमले नाही. इंग्लंडला 1986 पासून गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाला मात देणे शक्य झालेले नाही. (Ashes Test Series England Can Not Defeat Australia in Gabba Like India Done in 2019)

ashes test series
AUSvsENG : लायनकडून लायन्सचीच शिकार; कांगारुंची विजयी सुरुवात

गाबा कसोटीत (Gabba Test) ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 147 धावात संपुष्टात आणला आणि इंग्लंडच्या (England) पराभवाचा पाया रचला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 425 धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने (Joe Root) 89 धावा आणि डेव्हिड मलानने (Dawid Malan) 82 धावा करत प्रतिकार करण्यास सुरुवात केली. मात्र चौथ्या दिवशी नॅथन (Nathan Lyon) लायनने इंग्लंडच्या फलंदाजीला हादरे देत इंग्लंडचा दुसरा डाव 297 धावात संपवला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठीचे 19 धावांचे माफक आव्हान 6 षटकात पार करुन अॅशेसमध्ये गाबा कसोटी (Gabba Test) सातत्याने जिंकण्याची परंपरा कायम राखली.

ashes test series
टीम इंडियासाठी कायपण! आफ्रिका बोर्डानं उचललं मोठं पाऊल

दरम्यान, भारताने 2019 त्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India Tour Of Australia) ऑस्ट्रेलियाचा गाबा कसोटीत 3 विकेट्सनी पराभव केला होता. जवळपास 32 वर्षांनी ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी हरला होता. या कसोटीत ऋषभ पंतने (Rishabh Pant) नाबाद 89 धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाची भुमिका बजावली होती. दरम्यान, यंदाची अॅशेस मालिका सुरु होण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळाडूंनी भारताने गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दाखवून दिले की ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करता येते. ते घरच्या मैदानात अजेय नाहीत अशी वक्तव्ये केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.