Ashes : इंग्लंडने सामना, पैसा आणि कमावलेले पॉईंट्सही गमावले

ben stokes joe root
ben stokes joe rootesakal
Updated on

ब्रिसबेन : इंग्लंडने अॅशेस मालिकेतील (Ashes Test Series) ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धची गाबा कसोटी (Gabba Test) गमावली. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (England) ९ विकेट्स राखून पराभव केला. ऑस्ट्रेलिया सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १ - ० ने आघाडीवर आहे. दरम्यान, गाबावर इंग्लंडने फक्त सामना हारला नाही तर पैसेही गमावले आणि कमावलेले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गुणही (WTC Ponits) गमावले. (Ashes Test Series England Lose WTC Points and 100 Percent Match fee for Slow Over Rate)

ben stokes joe root
Video : नॅथन लायनने या खास विकेसाठी 326 दिवस पाहिले वाट

अॅशेस कसोटी मालिकेतील (Ashes Test Series) पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या मॅच फी (Match Fee) मधील १०० रक्कम आयसीसीने (ICC) कापून घेतली आहे. याचबरोबर त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील (WTC) ५ गुण देखील कापण्यात आले आहेत. आयसीसीने ही कारवाई स्लो ओव्हर रेटच्या (Slow Over Rate) कारणावरुन केली आहे. याचबरोबर सामनावीर ट्रॅव्हिस हेडच्या सामन्याच्या मानधनातून १५ रक्कम दंड म्हणून कापून घेतली आहे. (Ashes Test Series England lose WTC Points and 100 percent match fee for slow over rate)

ben stokes joe root
Cricket Record : एलेक्स कॅरीचा वर्ल्ड रेकॉर्ड, पंतला टाकलं मागे

आयसीसीच्या (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (WTC) कलम १६.११.२ नुसार ज्या संघाने निर्धारित वेळेनुसार कमी षटके टाकली असतील तर त्यांनी जितकी षटके कमी टाकली आहेत तितके गुण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणांमधून (WTC Points) कापून घेतले जातात. इंग्लंडने पहिल्या कसोटीत ५ षटके कमी टाकली. त्यामुळे त्यांचे पाच गुण कमी करण्यात आले आहेत. याचबरोबर सामनाधिकारी डेव्हिड बून (David Boon) यांनी इंग्लंडच्या खेळाडूंच्या मॅच फी मधून १०० रक्कम ही दंड म्हणून कापण्याची शिक्षाही दिली. आयसीसी कोड ऑफ कंडक्टच्या कलम २.२२ नुसार खेळाडू आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या स्टाफच्या मानधनातून कमी टाकलेल्या प्रत्येक षटकापाठीमागे सामन्याच्या मानधनातून २० टक्के रक्कम कापून घेतली जाते.

ben stokes joe root
Ashes : भारताने जे करुन दाखवले ते इंग्लंडला जमलेच नाही!

दरम्यान, सामनाधिकाऱ्यांनी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या (Travis Head) सामना मानधनातूनही १५ टक्के रक्कम कापून घेण्याची शिक्षा ठोठावली. हेडने आयसीसी कोड ऑफ कंडक्टचे (ICC Code of Conduct) कलम २.३ चे उल्लंघन केले होते. या कलमानुसार खेळाडूने जर सामन्यावेळी आक्षेपार्ह शब्दोच्चार केला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येते. याच कलमाखाली हेडला एक डीमेरिट पॉईंटही देण्यात आला आहे.

ट्रॅव्हिस हेडने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) पहिल्या डावातील ७७ व्या षटकावेळी बेन स्टोक्सला (Ben Stokes) उद्येशून काही आक्षेपार्ह भाषा वापरली होती. दरम्यान हेडने आपला गुन्हा मान्य केला आहे आणि मिळालेली शिक्षाही मान्य केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()