Ashish Nehra Coach : नेहराने मुख्य प्रशिक्षक पदाचा प्रस्ताव धुडकावला; टी 20 वर्ल्डकपसाठी BCCI पुन्हा करणार द्रविडची मनधरणी?

आशिष नेहराचा प्रस्ताव: द्रविडची मनधरणी, टी 20 वर्ल्डकपसाठी BCCI संघाच्या नियमानुसार द्रविडचा मुख्य प्रशिक्षक राहावा?
Ashish Nehra Coach
Ashish Nehra Coachesakal
Updated on

Ashish Nehra Coach : आशिष नेहरा आणि हार्दिक पांड्या या जोडीने गुजरात टायटन्सला आपल्या पहिल्या दोन्ही आयपीएल हंगामात फायनलपर्यंत पोहचवले. पहिल्याच हंगामात गुजरातने आयपीएल टायटल जिंकल्यानंतर या जोडीची जोरदार चर्चा सुरू झाली होती. हार्दिक कालांतराने भारतीय टी 20 संघाचा कर्णधार झाला.

त्यानंतर आशिष नेहरा देखील भारताच्या टी 20 संघाचा हेड कोच व्हावा अशी आशा चाहते व्यक्त करू लागले होते. वनडे वर्ल्डकपनंतर बीसीसीआयने आशिष नेहराशी संपर्क साधला होता असं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले. मात्र नेहराने हा प्रस्ताव धुडकावल्याचे कळते.

भारतात सुरू असलेला वनडे वर्ल्डकप नुकताच संपला असून आता बीसीसीआय पुढील वर्षी जून महिन्यात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपच्या तयारीला लागली आहे. भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा वनडे वर्ल्डकपनंतर करार संपुष्टात आला आहे.

त्यामुळे बीसीसीआय नव्या कोचच्या शोधात आहे. त्यांनी गुजरात टायटन्सचा कोच आशिष नेहराला गळ घातली होती. मात्र त्याने नकार दिल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. आता बीसीसीआयला द्रविडने टी 20 वर्ल्डकपपर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक रहावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

भारताचा तीनही फॉरमॅटमधील मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा वनडे वर्ल्डकप सोबतच करार संपला आहे. आता बीसीसीआय राहुल द्रविडसोबत नवा करार करण्यासाठी तयार आहे. पुढच्या वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत टी 20 वर्ल्डकप होणार आहे.

भारताने वनडे वर्ल्डकपची फायनल हरल्यानंतर बीसीसीआयने आशिष नेहराशी देखील संपर्क साधला होता. मात्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि निवडसमिती अध्यक्ष अजित आगरकर यांना द्रविडने पुढच्या टी 20 वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक पद सांभाळावे असे वाटते.

जर राहुल द्रविड यांनी नवा करार स्विकारला तर त्यांच्यासोबत गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांम्ब्रे आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासह सपोर्ट स्टाफचा देखील करार वाढवला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.