Rinku Singh Ashish Nehra IPL 2024 Auction : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात केकेआरचा स्टार फिनिशर रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपली डेथ ओव्हरमध्ये अडकलेला सामना काढून देण्याचं कसब दाखवलं. मात्र यावेळी त्याने आपल्या मॅच विनिंग खेळीने विश्वविजेत्यांचा तोंडचा घास पळवला.
शेवटच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज होती. मात्र अर्शदीप सिंग दुसरी धाव घेताना धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एक धावेची गरज होती त्यावेळी रिंकूने षटकार मारत सामना संपवला.
मात्र एबॉटने शेवटचा चेंडू नो बॉल टाकल्याने या षटकाराच्या धावा रिंकूच्या खात्यात जमा झाल्या नाहीत. कारण नो बॉलच्या एका धावेमुळे भारताने सामना आधीच जिंकला.
भारताने सामना जिंकल्यानंतर रिंकू, केकेआर अन् आयपीएलबाबत चर्चा सुरू होती. त्यावेळी गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराने बोलता बोलता काही संकेत दिले.
सामना झाल्यानंतर जिओ सिनेमाशी बोलताना रिंकू सिंहने (Rinku Singh) केकेआरने आपल्याला कारकिर्दीच्या सुरूवातीला कशी मदत केली होती हे सांगितले. रिंकूसोबत केकेआरचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर देखील तेथे होता. त्यावेळी रिंकूचा गेल्या 5 ते 6 वर्षाचा प्रवास कसा होता हे नायरने सांगितले.
तो म्हणाला, 'रिंकूचा हा प्रवास 5 ते 6 वर्षाचा होता.' त्यावेळी रिंकूने लगचेच सांगितलं की, केकेआरकडून आयपीएलची सुरूवात खडतर होती. ज्यावेळी मला 2018 मध्ये संधी मिळाली त्यावेळी मी संधीचं सोनं करू शकलो नाही. जर दुसरी आयपीएलची टीम असती तर त्यांनी मला वगळलं असतं. मात्र केकेआर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. अभिषेक नायर सरांनी माझ्यावर खूप कष्ट घेतले.'
दरम्यान, जिओ सिनेमावरचा क्रिकेट प्रेझेंटर गंमतीत म्हणाला, 'रिंकू सावध हो कारण लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सचे मार्गदर्शक इथं आहेत.'
यावर गुजरातचा कोच आशिष नेहरानं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'आता त्याला कोणत्याही मार्गदर्शकाची गरज नाही. त्याला ज्या स्तरावर पोहचायचं होतं तो त्या स्तरावर पोहचला आहे. ज्यावेळी तुम्ही क्रिकेटच्या मैदानात उतरता त्यावेळी इतर लोकं फक्त बाहेरून पाहू शकतात.'
नेहरा पुढे म्हणाला की, 'केकेआर तुला सोडणार नाही. मला वाटतं की त्यांनी तुला रिटेन करावं. मात्र जर त्यांनी तुला रिटेन केलं नाही तर उरलेले 9 संघ लिलावात तुला काही सोडणार नाहीत.'
आशिष नेहराच्या या वक्तव्यावरून त्याने डिसेंबर महिन्यात होणाऱ्या लिलावात जर संधी मिळाली तर रिंकूसाठी गुजरात टायनटन्स जोर लावणार असे संकेत दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.