टीम इंडियाला मोठा झटका!,R. Ashwin कोरोना पॉझिटिव्ह

r ashwin
r ashwinesakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला कोरोनाची लागण झाली आहे. अश्विन सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. कोविड१९ पॉझिटिव्ह असल्याने अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही.

r ashwin
छतातून पाणी आलं कसं? पावसानं BCCI ची केली पोलखोल

टीम इंडिया १ जुलैपासून एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविचंद्रन अश्विन कोरोना प्रोटोकॉलचे सर्व नियम पूर्ण केल्यानंतरच इंग्लंडला रवाना होईल. खरतरं, अश्विन संघासह यूकेला रवाना होणार होता. मात्र, तत्पूर्वी, त्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. सध्या तो क्वारंटाईनमध्ये आहे.

चेतेश्वर पुजारा, विराट कोहलीसह अनेक खेळाडू १६ जून रोजी इंग्लंडला रवाना झाले होते, तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा एका दिवसानंतर इंग्लंडमध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळल्यानंतर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर सोमवारी (२० जून) पहाटे इंग्लंडला रवाना झाले.

r ashwin
टीम इंडियासाठी खुशखबर, ताफ्यात लवकरच दाखल होणार हा खेळाडू

आर अश्विन शुक्रवारपासून खेळल्या जाणाऱ्या लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकणार आहे. मात्र, तो पहिल्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा कसोटी सामना पुढे ढकलण्यात आला होता. टीम इंडिया गेल्या वर्षी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती, त्यावेळी भारतीय संघ ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार होता, मात्र त्यानंतर मालिकेतील केवळ ४ कसोटी सामने खेळले गेले. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने पुढे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.