Asia Cup : जय शहांच्या जागी मी असतो तर; तिरंगा वादात प्रकाश राज यांची उडी

आशिया कपच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला.
Asia Cup : जय शहांच्या जागी मी असतो तर; तिरंगा वादात प्रकाश राज यांची उडी
Updated on

Prakash Raj Criticized Amit Shah And Jay Shah : नुकत्याच पार पडलेल्या अशिया चषकातील सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर संपूर्ण जगात सेलिब्रेशन करण्यात आले. मात्र, विजयानंतर मैदानात उपस्थित असलेल्या बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र जय शाह यांनी सहकाऱ्याने दिलेला तिरंगा पकडण्यास नकार दिला. जय यांच्या कृतीवर देशभरातून टीकेची झोड उठत असताना आता यामध्ये साऊथचा सुपर स्टार प्रकाश राज यांनी उडी घेतली असून, ट्वीट करत त्यांनी थेट केंद्र सरकारवरच टीका करत प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकाश राज यांचे ट्वीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरले आहे.

प्रकाश राज यांच्या ट्वीटमध्ये काय?

जय शाह यांच्या कृतीनंतर प्रकाश राज यांनी ट्वीट करत टीका केली आहे. यामध्ये त्यांनी “प्रिय सर्वोच्च नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह…जय शाहांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्यासाठी तिरंगा हातात धरुन फडकवावा हे गरजेचे नाही. पण जर कुणी बिगर भाजपा, बिगर हिंदू किंवा माझ्याप्रमाणेच तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्या एखाद्या व्यक्तीने असे कृत्य केले असते, तर त्यावर तुमची किंवा भाजपाच्या भक्तांची काय प्रतिक्रिया असती?” असा सवाल उपस्थित केला आहे.

Asia Cup : जय शहांच्या जागी मी असतो तर; तिरंगा वादात प्रकाश राज यांची उडी
IPL Media Rights : बक्कळ पैसा कमावल्यानंतर जय शहा काय म्हणाले?

भारत-पाक सामन्यादरम्यान नेमकं काय झालं?

आशिया कपच्या हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने भारताला 3 चेंडूत 6 धावांची गरज असताना षटकार मारून सामना जिंकून दिला. यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला.

Asia Cup : जय शहांच्या जागी मी असतो तर; तिरंगा वादात प्रकाश राज यांची उडी
Ind Vs Pak Asia Cup 2022: टीम इंडियाची 'त्रिमूर्ती' पाकिस्तानविरुद्ध पुन्हा अपयशी

भारताचे चाहते या विजयाचे सेलिब्रेशन हातात तिरंगा घेऊन करत होते. मात्र बीसीसीआय अध्यक्ष जय शहा यांनी मात्र तिरंगा हातात घेऊन तो फडकवण्यास नकार दिला. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि नव्या वादाला तोंड फुटले. त्यानंतर देशभरातून जय शहा यांच्यावर टीका केली जात आहे. त्यात आता प्रकाश राज यांनी देखील उडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.