Rohit Sharma T20 World Cup T20 World Cup : आशिया कप मध्ये भारतीय संघाची कामगिरी काही चांगली राहिली नाही. सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली आहे. आशिया चषक स्पर्धेत भारताच्या या तीन खेळाडूंनी अत्यंत खराब कामगिरी केली आहे. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा या खेळाडूंना T-20 World Cup साठी देणार संधी का? घरचा रस्ता दाखवणार.
आशिया चषकात युझवेंद्र चहलची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांनी अनेक धावा लुटल्या. युजवेंद्र चहलने आशिया कप 2022 मध्ये 4 सामने खेळले. या सामन्यांमध्ये युझवेंद्र चहलने 7.93 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या आणि फक्त 4 विकेट घेतल्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला, अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी देऊ शकतो.
आशिया कपमध्ये भारतीय स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत फ्लॉप ठरला आहे. ज्यावेळी टीम इंडियाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. त्यावेळी तो संघाला सोडून मध्येच पॅव्हेलियनमध्ये परतायचा. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 16 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या, ही त्याची या स्पर्धेतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. याआधी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋषभ पंतला केवळ 14 धावा करता आल्या. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात ऋषभ पंतने 13 चेंडूत 17 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमावली.
आशिया कपमध्ये आवेश खान टीम इंडियाची मोठी कमजोरी म्हणून समोर आला. आवेश खान लाइन लेंथपासून पूर्णपणे विचलित झालेला दिसला. विकेट मिळवण्यापासून दूर धावा वाचवण्यासाठी तो झुंजताना दिसला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आवेश खानने 2 षटकात 19 धावा दिल्या आणि त्याला फक्त 1 बळी घेता आली. हाँगकाँगविरुद्धही त्याने चार षटकांत 53 धावा दिल्या आणि एकच विकेट घेता आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.