SL vs PAK : लंका जिंकली कशी; भारताने 'या' सिंहांकडून काय शिकावे?

Asia Cup 2022 Final Sri Lanka Defeat Pakistan Learning Lessons For Team India
Asia Cup 2022 Final Sri Lanka Defeat Pakistan Learning Lessons For Team Indiaesakal
Updated on

Asia Cup 2022 Final Sri Lanka Defeat Pakistan : आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत विजयाचा षटकार मारला. श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले. लंकेच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 147 धावांत संपुष्टात आला. खराब सुरूवात करणाऱ्या श्रीलंकेने नंतर दमदार कमागिरी करत सामन्यावर नियंत्रण ठेवले. श्रीलंकेकडून भानुका राजापक्षेने 45 चेंडूत नाबाद 71 धावा केल्या. तर अष्टपैलू वानिंदू हसरंगाने फलंदाजीत आक्रमक 36 धावा तर गोलंदाजीत मौल्यवान रिझवानसह 27 धावात 3 विकेट घेतल्या. आजच्या सामन्यात श्रीलंकेने मोक्याच्या क्षणी सामन्यावर नियंत्रण मिळवले पाहुयात श्रीलंका जिंकली कशी आणि भारताने लंकेकडून काय शिकावे? (Asia Cup 2022 Sri Lanka Win Over Pakistan Have A Good Learning Lessons For Team India)

Asia Cup 2022 Final Sri Lanka Defeat Pakistan Learning Lessons For Team India
Asia Cup 2022 SL vs PAK : लंकेविरूद्ध पाकिस्तानच्या झाल्या एका चेंडूत 10 धावा

सकारात्मक हसरंगाने रचला पाया, भानुकाने चढवला कळस

पाकिस्तानने महत्वाची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या हारिस रौऊफने पॉवर प्लेमध्ये भेदक मारा करत श्रीलंकेची अवस्था 5 बाद 58 अशी केली होती. मात्र या अवघड परिस्थितीतही लंकेने सकारात्मकता दाखवली. त्यांच्या हसरंगा आणि भानुका राजापक्षेने 12 व्या षटकानंतर आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत हसरंगाच्या आक्रमक खेळीचा मोठा वाटा होता.

हसरंगा बाद झाल्यानंतर भानुका राजापक्षेने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत. पुढच्या पाच षटकात धावांची गती चांगली ठेवली. त्याने स्लॉग ओव्हरमध्ये आक्रमक फटके मारले .मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तो 20 व्या षटकापर्यंत खेळत नाबाद राहिला. त्याचा फायदा संघला अतिरिक्त 15 ते 20 धावा करण्यात झाला. लंकेने पाकिस्तानसमोर 170 धावा उभारल्या.

12 ते 20 मध्ये सामन्यावर नियंत्रण, भागीदारी रचण्यात अव्वल

भारताने यंदाच्या आशिया कपमध्ये बरेच बदल केले. विशेष करून रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यानंतर मधल्या फळीत बरेच बदल झाले. मात्र ते बदल करून देखील भारताला सामन्यावर नियंत्रण राखता आले नाही. त्याउलट श्रीलंकेने ग्रुप स्टेजमधील पराभवाचा धक्का पचवत फलंदाजी करताना भागीदारी रचवण्यावर भर दिला. बांगलादेशविरूद्ध सामन्यात श्रीलंकेकडून एकाही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नव्हते. मात्र प्रत्येक फलंदाजाने 30 - 35 धावा करत भागीदारी रचण्यावर भर दिला. याचा फायदा त्यांना 183, 175 अशा मोठ्या धावसंख्या चेस करण्यात झाल्या.

अंतिम सामन्यात परिस्थिती मात्र वेगळी होती. श्रीलंका चेस करणार नव्हती. मात्र तरी देखील लंकेने मोठ्या धावा करण्याची मानसिकचा ठेवली होती. त्यांनी सुरूवातीच्या पडझडीनंतर देखील 12 ते 20 या षटकांमध्ये सामन्यावर नियंत्रण ठेवले. याच टप्प्यात वानुंदू हसरंगाने आक्रमक तर भानुका राजपक्षेने त्याला साथ देणारी इनिंग खेळली. भारताने याच टप्प्यात मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्या. त्यामुळे अपेक्षित फायटिंग टोटल उभारता आली नाही.

गोलंदाजीत मधल्या फळीच्या विकेट घेणे

फलंदाजीप्रमाणेच गोलंदाजीतही श्रीलंकेने भारतापेक्षा सरस कामगिरी करून दाखवली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये विकेट घेतल्याच. मात्र नंतरच्या 6 ते 15 या षटकात देखील श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत विकेट्स घेतल्या. यात वानिंदू हसरंगाचा मोठा वाटा राहिला. त्याने चांगला मारा करत प्रतिस्पर्ध्यांच्या मोक्याच्या क्षणी मोठ्या विकेट्स घेण्यात यश मिळवले. असे यश भारताच्या युझवेंद्र चहल किंवा रवी बिश्नोई आणि अश्विनला जमले नाही.

कॅचेस विन मॅचेस

भारताने मोक्याच्या क्षणी झेल सोडले. त्याचा मोठा फटका बसला त्यामुळेच भारत आशिया कपमधून सुपर 4 मध्येच बाहेर पडला. पाकिस्तानने देखील अंतिम सामन्यात हीच चूक केली. त्यांनी मोक्याच्या क्षणी म्हणजे 17 व्या षटकात भानुका राजापक्षेचा कॅच सोडला. याचा फटका पाकिस्तानला बसला त्याने 45 चेंडूत नाबाद 71 धावांची खेळी केली. जर तो 17 व्या षटकात बाद झाला असता तर लंका 150 ते 155 धावांपर्यंतच मजल मारू शकली असती. झेल सोडल्याने चेस करणाऱ्या पाकिस्तानवर अतिरिक्त 20 धावांचे दडपण आले.

त्याउलट श्रीलंकेने आपल्या डावात एकही झेल सोडला नाही. काही अप्रतिम झेल देखील पकडले. यामुळे गोलंदाजांच्या कामगिरीला श्रीलंकेच्या फिल्डर्सनी देखील मोलाची साथ दिली.

Asia Cup 2022 Final Sri Lanka Defeat Pakistan Learning Lessons For Team India
Asia Cup SL vs PAK : पाकिस्तानच्या नांग्या ठेचत लंकेच्या सिंहांची 'जेतेपदाची' गर्जना

वन मॅन शो पेक्षा सांघिक खेळावर भर

श्रीलंकेच्या संघात एकही स्टार खेळाडू नाही. वानुंदू हसरंगा सोडला तर त्यांच्याकडे ग्लॅमरस चेहरा नव्हता. मात्र जो काही संघ होता तो एकसंघपणे खेळला. पराभवातही खचून न जाता सर्व खेळाडूंनी आपले योगदान दिले. कधी कुसल मेडीस, कधी दसुन शानका तर कधी वानिंदू हसरंगा यांनी संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. मात्र त्याच्या जोडीला इतरही खेळाडूंनी चांगली कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिले.

आजच्याच सामन्याचे उदाहरण घ्यायचे झाले तर 71 धावा करणाऱ्या राजापक्षेला हसरंगाच्या 36 आणि धनंजया डि सिल्वाच्या 28 धावांची साथ लाभली. गोलंदाजीत पॉवर प्लेमध्ये प्रमोद मधुशानने विकेट्स काढून दिल्या. त्यानंतर हसरंगाने मधल्या फेजमध्ये विकेट घेत पाकवर दबाव निर्माण केला. मधुशानने 4 तर हसरंगाने 3 विकेट घेतल्या. मात्र या दोघांप्रमाणे दिलशान मधुशंका, महीश तिक्षाणा आणि चमिरा करूणारत्ने यांनी देखील चांगला मारा करत या दोघांना उत्तम साथ दिली. एकानेही स्वैर मारा केला नाही. एकाचीही धावा देण्याची सरासरी दुहेरी आकड्यात गेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.