Asia Cup 2022 Final Sri Lanka Vs Pakistan : आशिया कपच्या फालयनल सामन्यात श्रीलंकेने खराब सुरूवातीनंतर पाकिस्तानसमोर 171 धावांचे आव्हान ठेवले. श्रीलंकेकडून भानुका राजापक्षेने दमदार फलंदाजी करत 45 चेंडूत नाबाद 71 धावांची झुंजार खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने 5 बाद 58 धावांवरून 6 बाद 170 धावा अशी मजल मरली. सामन्यात दमदार पुनरागमन केल्यानंतर लंका गोलंदाजीतही धडाकेबाज सुरूवात करेल असे वाटेत होते. मात्र इनिंगचे पहिलेच षटक टाकणाऱ्या दिलशान मधुशंकाने एक वैध चेंडू टाकताना 10 धावा दिल्या. त्यामुळे पाकिस्तानच्या 1 चेंडू 10 धावा झाल्या होत्या. (Asia Cup 2022 Final Sri Lanka Vs Pakistan in Dilshan Madhushanka)
श्रीलंकेने ठेवलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानची जोडी बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान मैदानावर आली होती. श्रीलंकेकडून पहिले षटक टाकण्यासाठी कर्णधार शनकाने चेंडू युवा दिलशान मधुशंकाकडे दिला. डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या चेंडूपासून 140 किमी प्रती तास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र त्याने पहिलाच चेंडू नो बॉल टाकला. त्यानंतर मधुशंकाने पुढचे सलग 4 चेंडू वाईड टाकले. यातील एका चेंडूवर बाईज 4 धावा देखील गेल्या. अखेर सहाव्या प्रयत्नात मधुशंकाने वैध चेडू टाकला. त्यावर रिझवानने 1 धाव घेतली. त्यामुळे पाकिस्तानच्या एका चेंडूत 10 धावा झाल्या होत्या. यात वाईडच्या 4, बाईज 4, नो बॉलची एक आणि वैध चेंडूवर रिझवानने घेतलेली 1 अशा 10 धावांचा समावेश होता.
जरी मधुशंकाने पहिला चेंडू टाकण्यात खूप गोंधळ घातला असला तरी त्याने पुढचे षटक चांगले टाकत फक्त 2 धावा दिल्या होत्या. त्यानंतर मधुशानने एकाच षटकात बाबार आझम आणि फखर झमान यांना बाद करत पाकिस्तानला बॅकफूटला ढकलले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.