India Vs Pakistan : बुडत्याचा पाय खोलात! Asia Cup मध्ये पाकिस्तानला अजून एक धक्का?

Asia Cup 2022 India Vs Pakistan fast bowler Mohammad Wasim pulling out of practice Due back pain
Asia Cup 2022 India Vs Pakistan fast bowler Mohammad Wasim pulling out of practice Due back pain esakal
Updated on

Asia Cup 2022 India Vs Pakistan : आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान जवळपास एका वर्षानंतर एकमेकांशी भिडणार आहे. 28 ऑगस्टला हा हाय व्होल्टेज सामना दुबईत रंगणार आहे. मात्र सामन्याला दोन दिवस शिल्लक असतानाच पाकिस्तानच्या तोफखाण्याला अजून एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतीमुळे आशिया कप खेळू शकणार नाही या धक्क्यातून सावत असतानाचा आता संघातील अजून एक वेगवान गोलंदाज मोहम्मद वासिमला (Mohammad Wasim) देखील दुखापत (Injury) झाली आहे. त्याने पाठदुखीचे कारण देत सरावाला दांडी मारली.

Asia Cup 2022 India Vs Pakistan fast bowler Mohammad Wasim pulling out of practice Due back pain
Asia Cup : भारताने श्रीलंकेतील आशिया कपवर बहिष्कार का घातला होता?

दरम्यान, पाकिस्तान संघव्यवस्थापनाने 21 वर्षाच्या मोहम्मद वासिमला एमआरआय करण्यास पाठवले होते. या चाचणीच्या अहवालात त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे हे स्पष्ट होईल. मोहम्मद वासिमला आयसीसी अॅकेडमीमध्ये सराव करताना पाठदुखीचा त्रास जाणवत होता. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना दुखापत असताना खेळवण्याची जोखीम घेऊ इच्छित नाही.

Asia Cup 2022 India Vs Pakistan fast bowler Mohammad Wasim pulling out of practice Due back pain
Asia Cup 2022 : दोन तगड्या संघाच्या ग्रुपमध्ये हाँगकाँगची एन्ट्री

पाकिस्तानचा युवा वेगवाग गोलंदाज मोहम्मद वासिमने आतापर्यंत 8 वनडे सामने तर 11 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने पाकिस्तानकडून गेल्या वर्षी जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. संघ व्यवस्थापन वासिमची दुखापत खूप गंभीर नसावी अशी आशा करत आहे. कारण पाकिस्तानला शाहीन आफ्रिदीच्या रूपात एक मोठा धक्का आधीच बसला आहे. त्यात आता पाकिस्तानची दुसरी तोफ जर सामन्यापूर्वीच निकामी झाली तर पाकिस्तानची आशिया कपमध्ये डोखेदुखी वाढणार आहे. विशेषकरून भारताच्या तगड्या फलंदाजीला रोखण्यासाठी संघातील अव्वल वेगवान गोलंदाज फिट असणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.