Asia cup 2022 India vs Pakistan MS Dhoni Suresh Raina : आशिया कप 2022 ला आजपासून सुरू होणार आहे. पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. दुबईत होणाऱ्या या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. आशिया चषकाच्या पदार्पणाच्या सामन्यात शतके झळकावणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर त्यात फक्त दोन भारतीयांचा समावेश आहे.
आशिया कपमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह अनेक खेळाडूंनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे, मात्र या स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात केवळ दोन भारतीयांना शतक करता आले आहे. माजी दिग्गज कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 109 धावांची खेळी करत हा पराक्रम केला आहे. तर सुरेश रैनाने 101 धावांची शानदार खेळी करत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय खेळाडूंनी आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध चांगलीच कामगिरी केली आहे. कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड राहिला आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकविरुद्ध 'मॅन ऑफ द मॅच' जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. कोहलीने 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची इनिंग खेळली होती. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. तर दुसरा सामना 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया कप 2022 चा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, अवेश खान
पाकिस्तान संघ : बाबर आझम, शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.