Asia Cup 2022 : पाकिस्तान भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी धडाडणाऱ्या तोफेला देणार विश्रांती

Asia Cup 2022 India Vs Pakistan Pakistan May Give Rest To Shaheen Afridi In Netherland Tour
Asia Cup 2022 India Vs Pakistan Pakistan May Give Rest To Shaheen Afridi In Netherland Touresakal
Updated on

Asia Cup 2022 India Vs Pakistan : आशिया कपच्या दुसऱ्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान सामन्याची मेजवाणी क्रिकेट रसिकांना पहावयास मिळणार आहे. 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यातला हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दरम्यान, आशिया कपसाठीत भारत आणि पाकिस्तान यांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. आशिया कप पूर्वी पाकिस्तान नेदरलँडसोबत वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेत पाकिस्तान आपला सर्वात अव्वल वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला (Shaheen Afridi) विश्रांती देण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत कर्णधार बाबर आझमने दिले आहेत.

युएईमध्ये गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. कोणत्याही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते. मात्र गेल्या वर्ल्डकपमध्ये त्यांनी ही किमया करून दाखवली. गेल्या टी 20 वर्ल्डकपमधील सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने भेदक मारा करत भारताचे सगळे अव्वल फलंदाज बाद करून भारतीय फलंदाजीला मोठे खिंडार पाडले होते. आता आशिया कप स्पर्धेत देखील पाकिस्तानच्या गोलंदाजीची मदार त्याच्यावरच असेल. मात्र त्याला दुखापतींनी ग्रासले आहे. त्यामुळे भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान या आपल्या धडाडणाऱ्या तोफेला थोडी विश्रांती देण्याचा विचार करत आहे.

याबाबत कर्णधार बाबर आझम म्हणाला की, 'आम्ही शाहीन शाहच्या फिटनेसवर बऱ्याच काळापासून नजर ठेवून आहे. आम्हाला वाटते की जर तो फिट असले आणि आशिया कपमध्ये खेळण्यास तयार असेल तर त्याने नेदरलँड विरूद्धच्या मालिकेत खेळावे. पाकिस्तानने आशिया कप आणि नेदरलँड दौऱ्यासाठी हसन अलीला आराम दिला आहे. निवडसमितीने नसीम शाह, शाहनवाज दहानी, हारिस रऊफ आणि मोहम्मद वसीम यांनाच प्राथमिकता दिली आहे. शाहीन शाह आफ्रिदी दुखापतग्रस्त आहे तरी त्याला संघात स्थान मिळवले आहे.

बाबर आझम बोलताना पाकिस्तानच्या संघात आशिया कप आणि टी 20 वर्ल्डकप दोन्ही जिंकण्याची क्षमता आहे हे भर देऊन सांगितले. तो म्हणाला की, 'आमच्याकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामधील प्रत्येकाकडे त्याचा दिवस असेल त्यावेळी एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. मला संघातील प्रत्येकावर विश्वास आहे. मग जो फलंदाज असो वा गोलंदाज. नेदरलँड विरूद्ध पाकिस्तानचा संघ 16 ऑगस्टपासून रॉटरडॅम येथे तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. बाबर म्हणाला की, 'सुपर लीगचे महत्वपूर्ण गुण पणाला लागले आहेत. हे गुण आम्ही गमावू शकत नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()