Asia Cup IND vs PAK Playing-11 : पंत-कार्तिक कोण होणार बाहेर? हे असू शकते भारत-पाक प्लेइंग-11

भारतीय कर्णधार रोहित शर्मा पाकिस्तान विरुद्ध या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग-11 मध्ये बरेच बदल करू शकतो
Asia Cup IND vs PAK Playing-11
Asia Cup IND vs PAK Playing-11
Updated on

Playing 11 of India vs Pakistan Asia Cup 2022 T20I Match : आशिया कप 2022 चा दुसरा सामना आज भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये खेळल्या जाणार आहे. या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाईल. भारतीय कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग-11 मध्ये बरेच बदल करू शकतो. माजी कर्णधार विराट कोहली 41 दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि केएल राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करत आहे. अशा स्थितीत त्याला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळण्याची खात्री आहे.

Asia Cup IND vs PAK Playing-11
VIDEO : आंद्रे रसेलचा मैदानात धुमाकूळ; 6 चेंडूत सलग ठोकले 6 षटकार

रोहितसोबत राहुल सलामी करू शकतो. तर कोहली तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. यानंतर मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादवसह हार्दिक पांड्याकडे दिली जाऊ शकते. यष्टिरक्षक-फलंदाज बाबत थोडा संभ्रम आहे. कर्णधार रोहित त्याच्या प्लेइंग-11 मध्ये ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यापैकी एकाला बेंचवर बसवू शकतो. त्यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजाला सातव्या क्रमांकावर संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. दुसरा फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहलही खेळणार हे जवळपास निश्चित आहे. या सामन्यात तिसऱ्या फिरकीपटूसोबत रोहित शर्मा गेला तर रविचंद्रन अश्विनलाही संधी मिळू शकते. अन्यथा त्यांच्या जागी आवेश खानला जागा मिळू शकते. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे दोन वेगवान गोलंदाज राहू शकतात.

Asia Cup IND vs PAK Playing-11
Asia Cup 2022: गेल्या 20 वर्षात Ind-Pak मध्ये 59 सामने झाले, जाणून घ्या कोण ठरला 'बाप'

बाबर आझमसाठी या सामन्यात प्लेइंग-11 निवडणे ही मोठी समस्या असेल. पाकिस्तान संघात टॉप-7 मध्ये कोणताही बदल होणे कठीण आहे. अवघड गोलंदाजी लाइनअप उभारावी लागेल. शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांच्या अनुपस्थितीत तगड्या गोलंदाजीची निवड करणे बाबरसमोर आव्हान असेल.

शादाब खान उपकर्णधार आहे, त्यामुळे तो खेळणार याची खात्री आहे. अशा स्थितीत उस्मान कादिर किंवा मोहम्मद नवाज यापैकी एकाला दुसरा फिरकी गोलंदाज म्हणून ठेवता येईल. वेगवान गोलंदाजीत शाहीनच्या अनुपस्थितीत नसीम शाह आणि हरिस रौफ यांचा खेळ जवळपास निश्चित मानला जाऊ शकतो. तिसरा गोलंदाज म्हणून मोहम्मद हसनैन किंवा शाहनवाज दहनी यापैकी एकाला संधी मिळू शकते.

Asia Cup IND vs PAK Playing-11
IND vs PAK Asia Cup 2022 : हार्दिक पांड्याचा जलवा; धोनी स्टाईलने षटकार मारत संपवला सामना
  • भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दीपक हूडा, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्षदीप सिंग आणि आवेश खान.

  • पाकिस्तान : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर झमान, हैदर अली, हारिस रॉफ, इफ्तेकार अहमद, शुशादिल शाह, महम्मद नवाझ, महम्मद रिझवान, हसन अली, नसीम शाह, शहनवाझ दहानी, उस्मान कादिर आणि महम्मद हसनैन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.