Asia Cup 2022 : पाकिस्तानविरूद्ध अशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन

Asia Cup 2022 India Vs Pakistan Team India Playing Eleven Prediction
Asia Cup 2022 India Vs Pakistan Team India Playing Eleven Prediction esakal
Updated on

Asia Cup 2022 India Vs Pakistan : भारताचा झिम्बाब्वे दौरा आज संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता आशिया कपचे वेध लागतील. आशिया कपमध्ये देखील भारताचा पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूद्ध होणार आहे. हा सामना 28 ऑगस्टला खेळवला जाईल. पाकिस्तानने गेल्या वर्षी युएईमध्येच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभव केला होता. आता आशिया कपमध्ये भारताला या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे.

Asia Cup 2022 India Vs Pakistan Team India Playing Eleven Prediction
Ruturaj Gaikwad : ऋतुराजला पुण्यात मिसळ नाही तर 'हा' पदार्थ खायला आवडतो

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात या सामन्याविषयी तुफान क्रेझ निर्माण झाली आहे. दरम्यान, दोन्ही संघांना या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी दुखापतींचा फटका बसला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दोघेही दुखापतींमुळे आशिया कप खेळू शकणार नाहीयेत. त्यामुळे भारताची पाकिस्ताविरूद्धची प्लेईंग इलेव्हन कशी असेल याची चर्चा रंगली आहे.

Asia Cup 2022 India Vs Pakistan Team India Playing Eleven Prediction
VIDEO | Shubman Gill : पहिल्या शतकानंतर गिलचे भन्नाट सेलिब्रेशन होतंय व्हायरल

..तर अशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन

1 रोहित शर्मा (कर्णधार)

2 केएल राहुल

3 विराट कोहली

4 सूर्यकुमार यादव

5 ऋषभ पंत

6 हार्दिक पांड्या

7 रविंद्र जडेजा

8 भुवनेश्वर कुमार

9 अर्शदीप सिंग

10 युझवेंद्र चहल

11 आवेश खान

Asia Cup 2022 India Vs Pakistan Team India Playing Eleven Prediction
Shubman Gill : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शुभमन गिलने ठोकले पहिले शतक

या प्लेईंग इलेव्हन नुसार भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात बेंचवर बसावे लागेल. यात फिनिशर दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू आर. अश्विनचा देखील समावेश आहे. याचबरोबर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेला आणि टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्यासाठी आपली प्रबळ दावेदारी सादर करणारा दीपक हुड्डा याला देखील पाकिस्तान विरूद्ध अंतिम 11 च्या संघात स्थान मिळण्याची शक्यता थोडी कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.