Asia Cup 2022 : भारत मुंबईतून तर पाकिस्तान अ‍ॅमस्टरडॅममधून दुबईसाठी रवाना

Asia Cup 2022 Indian Team and Pakistan Cricket Team Leave For Dubai
Asia Cup 2022 Indian Team and Pakistan Cricket Team Leave For Dubaiesakal
Updated on

Asia Cup 2022 : आशिया कप 2022 येत्या 27 ऑगस्टपासून सुरू होत आहे. भारताचा पहिलाच सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 28 ऑगस्टला होणार आहे. मात्र या सामन्याची क्रेज आतापासूनच पहावयास मिळत आहे. दरम्यान, या हाय व्होल्टेज सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ दुबईसाठी आज रवाना झाले. पाकिस्तानचा संघ नेदरलँडविरूद्धची मालिका खेळून थेट अ‍ॅमस्टरडॅममधून दुबईसाठी रवाना झाली. तर भारतीय संघ भारतातून दुबईसाठी रवाना झाला. (Asia Cup 2022 Indian Team and Pakistan Cricket Team Leave For Dubai)

Asia Cup 2022 Indian Team and Pakistan Cricket Team Leave For Dubai
Asia Cup 2022 : भारत - पाकिस्तान लढतीत कोणाचं आहे पारडं जड?

पाकिस्तानने गेल्याच वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्येच झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचा 10 विकेट्सनी पराभन केला होता. वर्ल्डकप इतिहासातील हा भारताचा पाकिस्तानकडून झालेला पहिला पराभव होता. गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताचा दुबईतच पराभव केला होता. त्यामुळे पाकिस्तान संघाचे मनोबल वाढले असेल.

दुसरीकडे तेव्हाच्या भारतीय टी 20 संघात आणि आताच्या टी 20 संघात बराच फरक झाला आहे. आता संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर आली आहे. त्याचा कॅप्टन म्हणून विजयाचा ट्रॅक रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यामुळे भारत टी 20 वर्ल्डकपमधील पराभवाचा बदला. त्याच मैदानावर घेण्यासाठी जोर लावले.

Asia Cup 2022 Indian Team and Pakistan Cricket Team Leave For Dubai
Asia Cup 2022 : भारत मुंबईतून तर पाकिस्तान अ‍ॅमस्टरडॅममधून दुबईसाठी रवाना

दरम्यान, भारतीय संघ दुबईला रवाना होण्यापूर्वीच भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्यामुळे तो अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत आशिया कपमध्ये भारतीय संघाशी जोडला जाणार नाही. राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती प्रसिद्धपत्रकाद्वारे बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी दिली. याचवेळी त्यांनी भारतीय संघ 23 ऑगस्ट म्हणजे आज दुबईत दाखल होईल असे सांगितले.

भारतीय संघातील जास्तीजास्त खेळाडू हे मुंबईतून दुबाईसाठी रवाना झाले. तर केएल राहुल, दीपक हुड्डा आणि स्टँड बाय खेळाडू अक्षर पटेल हरारे मधून दुबईसाठी रवाना होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.