Asia Cup 2022 : राहुल द्रविडला कोरोनाची लागण; टीम इंडियाला आशिया चषकापूर्वी मोठा धक्का

आशिया कपच्या तयारीवर परिणाम; लक्ष्मण करू शकतात मुख्य प्रशिक्षकाची भूमिका
rahul dravid test covid 19 positive
rahul dravid test covid 19 positivesakal
Updated on

Asia Cup 2022 Rahul Dravid Covid Positive : 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल द्रविडची यूएईला जाण्यापूर्वी कोविड-19 चाचणी करण्यात आली होती. राहुल द्रविडच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण आशिया चषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावताना दिसू शकतात.

rahul dravid test covid 19 positive
IND vs ZIM : झिम्बाब्वेचा पराभव करत भारताने पाकिस्तानची ठेचली नांगी

आशिया कपमधूनच राहुल द्रविड कदाचित बाहेर जाऊ शकतात. मात्र, बीसीसीआयकडून राहुल द्रविडबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट जारी करण्यात आलेले नाही. यापूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणला झिम्बाब्वे दौऱ्यावर मुख्य प्रशिक्षक म्हणून पाठवण्यात आले होते. इतकेच नाही तर लक्ष्मण गेल्या तीन महिन्यांपासून टीम इंडियाशी जोडला गेला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यातही लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक होता. केएल राहुल आणि व्हीव्हीव्हीएस लक्ष्मण यांनी झिम्बाब्वेविरुद्ध क्लीन स्वीप केला.

rahul dravid test covid 19 positive
Video : 'तेनु काला चश्मा जचदा ऐ...' इशानला फटके देत टीम इंडियाचा धांसू डान्स

आशिया कपसाठी टीम इंडिया आज यूएईला रवाना होणार आहे. मात्र, राहुल द्रविड टीम इंडियासोबत यूएईला रवाना होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वेहून यूएईला आलेल्या खेळाडूंसह आशिया कपसाठी टीम इंडियामध्ये सामील होऊ शकतो. आशिया चषक स्पर्धेतील टीम इंडियाची मोहीम 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. संघाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाशी टक्कर द्यावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()