Rishabh Pant Asia Cup : आशिया चषक-2022 मध्ये श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया टूर्नामेंटमधून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. दुबईत मंगळवारी झालेल्या सुपर-4 च्या सामन्यात पुन्हा एकदा शेवटच्या षटकापर्यंत लढत झाली. ज्यात भारतीय संघाचा 6 विकेट्सने पराभव झाला. सामन्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर श्रीलंकेला दोन धावांची गरज असताना ऋषभ पंतकडे चेंडू गेला पण त्याला थ्रो थेट करता आला नाही आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. ऋषभ पंतने ही संधी गमावली, तेव्हा चाहत्यांना सोशल मीडियावर एमएस धोनीची आठवण झाली.
श्रीलंकेला विजयासाठी शेवटच्या 20 व्या षटकात सात धावांची गरज होती आणि भानुका राजपक्षे आणि दासुन शनाका स्ट्राइकवर होते. भारतीय कर्णधार रोहित शर्माने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी अर्शदीप सिंगकडे सोपवली. पाचव्या चेंडूवर शनाकाचा शॉट चुकला आणि चेंडू यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे गेला. त्याने थ्रो केला, पण स्टंप चुकला. चेंडू थेट अर्शदीप सिंगकडे गेला आणि त्यानेही फेकली जी चुकली. यासह श्रीलंकेने दोन धावा पूर्ण करत भारताने सामना गमावला. महत्त्वाच्या सामन्यात पंतने निर्णायक टप्प्यावर धावबाद होण्याची संधी गमावल्याने सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केले जात आहे.
2016 च्या T20 विश्वचषकातही श्रीलंकेच्या काही सामन्यांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तो सामना आठवून चाहत्यांनी पंतला ट्रोल केले. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात धोनीने आपल्या क्षेत्ररक्षणाने टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. बांगलादेशला शेवटच्या चेंडूवर दोन धावा हव्या होत्या. हार्दिक पांड्याच्या चेंडूवर फलंदाजाचा फटका चुकला. चेंडू यष्टीरक्षक माहीपर्यंत पोहोचतो. फेकण्याऐवजी धोनीने स्टंपच्या दिशेने धाव घेत फलंदाजाला धावबाद केले. तो प्रसंग आठवून चाहत्यांनी विचारले की पंतने एवढा वेग का दाखवला नाही.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 विकेट गमावून 173 धावा केल्या. रोहित शर्माने 72 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19.5 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.