T20 World Cup : टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं खरं कारण आले समोर, BCCI ची चिंता वाढली

T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ निवडीदरम्यान संघाच्या खराब कामगिरीवर चर्चा झाली
T20 World Cup India Squad
T20 World Cup India Squadsakal
Updated on

T20 World Cup 2022 India Squad : आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. टीम इंडिया अंतिम फेरीतही पोहोचू शकली नाही. सुपर-फोरमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्ध विजय मिळून चांगली सुरुवात केली. यानंतर मात्र रोहितने सेनेचा वेग गमावला आणि पाकिस्तानसह श्रीलंकेकडून संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खराब कामगिरीचे प्रमुख कारण मधल्या षटकांमध्ये फलंदाजी आहे. भारतीय फलंदाजांना मधल्या षटकांमध्ये वेगाने धावा करता आल्या नाहीत. सातव्या ते पंधराव्या षटकांदरम्यान भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकली, तर पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी नऊ षटकांत 59 धावा केल्या आणि तीन विकेट गमावल्या.

T20 World Cup India Squad
Suryakumar Yadav : पदार्पणातच पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणारा 'सूर्या' वर्ल्डकप साठी तयार

हाँगकाँगविरुद्ध या षटकांत केवळ 62 धावा झाल्या होत्या, तर पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोरच्या सामन्यात या षटकांत 62 धावा झाल्या होत्या. या नऊ षटकांमध्ये भारताची सर्वोत्तम कामगिरी श्रीलंकेविरुद्ध होती. त्याच्याविरुद्ध भारताने 78 धावा केल्या होत्या. T20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ निवडीदरम्यान संघाच्या खराब कामगिरीवरही चर्चा झाली, जिथे मधल्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी हा महत्त्वाचा मुद्दा होता.

T20 World Cup India Squad
Suryakumar Yadav : पदार्पणातच पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणारा 'सूर्या' वर्ल्डकप साठी तयार

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आशिया कपमधील कामगिरीवर चर्चा झाली. समस्यांऐवजी उपायांवर लक्ष केंद्रित केल्या गेले. टी-20 विश्वचषकादरम्यान कोणत्या क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे यावर चर्चा झाली. सर्वांनी मान्य केले की मधल्या षटकांमध्ये फलंदाजी ही एक समस्या आहे. विशेषत: 7 व्या ते 15 षटकांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बीसीसीआयचा हा चिंतेचा विषय आहे.

भारताचा टी 20 वर्ल्डकपसाठीचा संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.