Asia Cup : Team India चा मुक्काम दुबईला 'या' आलिशान हॉटेलमध्ये, किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

आशिया चषकसाठी दुबईच्या या आलिशान रिसॉर्टमध्ये टीम इंडियाचा मुक्काम
asia cup 2022 team india stay in hotel palm jumeirah resort
asia cup 2022 team india stay in hotel palm jumeirah resortsakal
Updated on

Asia Cup 2022 Team India Hotel in Dubai : जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजर सध्या आशिया चषक 2022 वर लागून राहिली आहेत. आशिया कपला टी-20 स्पर्धेस आजपासून सुरुवात होत आहे. यावेळी ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. सर्व संघ तेथे पोहोचले असून तयारीत व्यस्त आहेत. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. अशा परिस्थितीत दुबईच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे खेळाडू पाम जुमेराह रिसॉर्टमध्ये मुक्काम करत आहेत. त्याच वेळी पाकिस्तानसह उर्वरित संघ बिझनेस बे हॉटेलमध्ये थांबले आहेत.

asia cup 2022 team india stay in hotel palm jumeirah resort
Asia Cup 2022 : Ind-Pak लढत महागडी; तरीही हाऊसफुल्ल

टीम इंडिया इथे आल्यापासून या चर्चेला जोर आला आहे. कारण हे रिसॉर्ट्स काही सामान्य रिसॉर्ट नाहीत. हॉटेलच्या आत आपण खरेदी करू शकता कारण त्याच्या आत बरीच दुकाने आहेत. याशिवाय हॉटेलमध्ये 3d, 4dx थिएटर्स देखील आहेत. हॉटेलमध्ये एक प्रेक्षणीय दृश्य आहे जिथून संपूर्ण शहराचे सुंदर दृश्य पाहता येते. गेल्या वर्षी झालेल्या T20 विश्वचषकादरम्यानही भारतीय खेळाडू पाम जुमेराह रिसॉर्टमध्ये थांबले होते. पाम जुमेराहची गणना जगातील आलिशान हॉटेल्समध्ये केली जाते. हॉटेलमध्ये तुम्ही सर्व आधुनिक सुविधांचा आनंद घेऊ शकता. या हॉटेलमध्ये एका दिवसाच्या मुक्कामाचे किमान भाडे 30 हजार रुपये असून ते 50-80 हजार रुपयांपर्यंत जाते.

asia cup 2022 team india stay in hotel palm jumeirah resort
IND vs PAK : Asia Cup च्या पदार्पणाच्या सामन्यात 'या' 2 जिगऱ्यांनी ठोकले शतक

आशिया कप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध रेकॉर्ड चांगला राहिला आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकविरुद्ध 'मॅन ऑफ द मॅच' जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. कोहलीने 2012 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची इनिंग खेळली होती. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. तर दुसरा सामना 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध खेळणार आहे. आशिया कप 2022 चा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.