Virat Kohli : कोहली पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात पूर्ण करणार 'शतक'

Virat Kohli Asia Cup 2022 100th T20I match
Virat Kohli Asia Cup 2022 100th T20I matchesakal
Updated on

नवी दिल्ली : आशिय कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघात माजी कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार केएल राहुलचे पुनरागमन होत आहे. मात्र जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आशिया कप खेळू शकणार नाहीये. भारताचा आशिया कपमध्ये पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरूद्ध होणार आहे. टी 20 वर्ल्डकप नंतर भारत पाकिस्तान पहिल्यांदाच भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याची दोन्ही देशातील क्रिकेट चाहते चातकासारखी वाट पाहत आहेत. (Asia Cup 2022 Virat Kohli to play Vs Pakistan Complete 100th T20I match)

Virat Kohli Asia Cup 2022 100th T20I match
Team India च्या 'या' खेळाडूंचे स्वप्न भंगले! Asia Cup साठी नाही दिले संघात स्थान

दरम्यान, विराट कोहलीसाठी पाकिस्तान विरूद्धचा सामना हा खास असणार आहे. विराट जरी गेल्या तीन वर्षापासून शतक ठोकू शकलेला नसला तरी तो पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात मैदानावर उतरताच शतक ठोकणार आहे. हे शतक टी 20 सामन्यांचे असेल. विराट कोहली टी 20 कारकिर्दितील आपला 100 वा सामना पाकिस्तान विरूद्ध खेळणार आहे. विशेष म्हणजे भारताकडून टी 20 मध्ये सामन्यांचे शतक पूर्ण करणारा विराट कोहली रोहित शर्मानंतरचा दुसराच खेळाडू आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत 132 सामने खेळले आहेत. तर विराट कोहलीने 99 टी 20 सामने खेळले असून त्यात त्याने 3308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्यांमध्ये 50.12 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. आता विराट कोहली पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात उतरून बॅटने काय कमाल करतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Virat Kohli Asia Cup 2022 100th T20I match
Asia cup 2022 : या दोन खेळाडूंचं भविष्य ठरवणारी स्पर्धा

अशी कामगिरी करणारा विराट पहिला भारतीय

विराट कोहली पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात मैदानावर उतरताच टी 20 क्रिकेटमधील सामन्यांचे शतक पूर्ण करेल. तसेच भारताकडून टी 20, वनडे आणि कसोटीत सामन्यांचे शतक पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरले. गेल्या वेळी विराट कोहली पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात उतरला होता त्यावेळी तो संघाचा कर्णधार होता. त्याने अर्धशतकीय खेळी देखील केली होती. विराटने त्या सामन्यात 49 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. मात्र पाकिस्तानने हा सामना 10 विकेट्स राखून जिंकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.