Team India Schedule : मोहीम आशिया कप 2023 फत्ते! पुढे काय?, जाणून घ्या टीम इंडियाचे शेड्यूल

Team India Schedule
Team India Schedule
Updated on

Team India Schedule : टीम इंडियाने आशिया कप 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि आठव्यांदा हे विजेतेपद पटकावले. भारतीय संघाने या स्पर्धेत सर्वच विभागात चांगली कामगिरी केली. आशिया कप 2023 च्या अंतिम फेरीत भारतीय संघाने श्रीलंकेचा ज्या प्रकारे पराभव केला ते पाहून चाहत्यांच्या मनात वनडे वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा निर्माण झाली.

आशिया कपदरम्यान भारतीय संघाने फायनल, सुपर 4 आणि गट टप्प्यात एकूण 6 सामने खेळले. या काळात त्याने पाच सामने जिंकले. जे एकदिवसीय वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियासाठी खूप चांगले संकेत आहे.

Team India Schedule
Rohit Sharma : आशिया कप जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या वक्तव्याने वर्ल्डकप आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन!

भारतीय संघ आता एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेसाठी पूर्णपणे सज्ज झालेला दिसत आहे. भारतीय फलंदाजांपासून ते गोलंदाजांपर्यंत सर्वजण चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. पण आशिया कपनंतर आता काय? टीम इंडियाची भविष्यातील योजना काय आहे? मिशन आशिया कप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर भारतीय संघाला कोणत्या संघांविरुद्ध खेळायचे आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Team India Schedule
India Austrolia One Day : भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ सज्ज; कमिन्स, स्मिथ, स्टार्क, मॅक्सवेलचे पुनरागमन

भारतीय संघाचे पुढील वेळापत्रक

एकदिवसीय वर्ल्डकप यंदा भारतात खेळवला जाणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व संघांचे पूर्ण लक्ष एकदिवसीय सामन्यांवर आहे. भारतीय संघाचीही या दिशेने वाटचाल सुरू आहे. आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आलेला नाही, तर ऑस्ट्रेलियन संघाने रविवारी भारत दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. वर्ल्डकपपूर्वी भारताची ही शेवटची वनडे मालिका असेल.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेची तारीख

  • २२ सप्टेंबर – पहिली वनडे (मोहाली)

  • २४ सप्टेंबर – दुसरी वनडे (इंदूर)

  • २७ सप्टेंबर – तिसरी एकदिवसीय (राजकोट)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर भारतीय संघ एकदिवसीय वर्ल्डकप खेळणार आहे. जिथे त्यांना साखळी टप्प्यात एकूण 9 सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. एकदिवसीय वर्ल्डकप ही भारतासाठी या वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.