Asia Cup 2023 Mohammad Naim Video : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही कितीही चागंले खेळाडू असला, तुम्ही कितीही फॉर्ममध्ये असला तरी एका फलंदाजाला बाद करण्यासाठी एक चेंडू बस असतो. तसचे एका चेंडूवर गोलंदाजाचंही सगळं होत्याचं नव्हतं होऊ शकत. त्यामुळे क्रिकेटपटू हे थोडे श्रद्धाळू असतात. मात्र बांगलादेशच्या एका क्रिकेटपटूने तर कहर केला आहे. (Walking On Fire Video)
बांगलादेशचा क्रिकेटपटू मोहम्मद नैमचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नैम हा बांगलादेशचा डावखुऱा सलामीवीर आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओत तो धगधगत्या निखाऱ्यावरून चालताना दिसतोय. त्याला हे करण्यासाठी एक साबित रेहान हा इसम प्रवृत्त करतानाही या व्हिडिओत दिसतोय.
नैम याने या व्हिडिओला कॅप्शन देताना माईंड ट्रेनिंगचं नाव दिलं आहे. रेहान हा लोकांना आपली मानसिक ताकद वाढवण्यासाठी मदत करतो असा दावा केला जातो. निखाऱ्यावरून चालणं हा एक त्याच्या माईंट ट्रेनिंगचाच भाग असल्याचे सांगितले जाते. तो बांगलादेश प्रीमियर लीगच्या रंगपूर रायडर्सचा देखील भाग होता.
नैम यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकडे फार काही उत्साहवर्धक नाही. 23 वर्षाच्या मोहम्मद नैमने मार्चमध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला आतापर्यंत फक्त 4 सामनेच खेळायला मिळाले आहेत. त्या तीन डावात फक्त 10 धावा केल्या आहेत. असे असले तरी बांगलादेशच्या आशिया कप 2023 च्या संघात निवड झाली आहे.
बांगलादेशचा आशिया कपमधली पहिला सामना हा श्रीलंकेविरूद्ध 31 ऑगस्टला कँडी येथे होणार आहे.
बांगलादेशचा आशिया कपसाठीचा संघ :
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंझिद तमिम, नजमुल हुसैन शांतो, तोविद हरिदोय, मुश्फिकूर रहीम, मेहदी हसन मिर्झा, तस्किन अहमद, मुस्तफिजूर रहमान, हसन महमुद, शेख महेदी, नसुम अहमद, शमिम हुसैन, अफिफ हुसैन, शोरिफुल इस्लाम, इबादत हुसैन, मोहम्मद नैम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.