Asia Cup 2023 : संघाची घोषणा होताच मोठा धक्का! दिग्गज वेगवान गोलंदाज स्पर्धेतून बाहेर

Asia Cup 2023 Bangladesh Team
Asia Cup 2023 Bangladesh Team
Updated on

Asia Cup 2023 Bangladesh Team : आशिया कप 2023च्या तोंडावर बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन मंगळवारी गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी स्पर्धेतून बाहेर पडला.

इबादतला 10 दिवसांपूर्वी आशिया कप 2023 मध्ये स्पर्धेसाठी 17 जणांच्या संघात स्थान देण्यात आले होते, परंतु निर्धारित वेळेत दुखापतीतून सावरण्यात तो अपयशी ठरला होता, त्याच्या जागी 20 वर्षीय नवा वेगवान गोलंदाज तनझिम हसनचा समावेश करण्यात आला होता.

Asia Cup 2023 Bangladesh Team
Ire vs Ind 3rd T20 : सलग दोन विजयानंतरही टीम इंडियात होणार मोठं बदल, 'या' राखीव खेळाडूंना संधी मिळणार?

5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 29 वर्षीय खेळाडू वेळेत तंदुरुस्त होईल की नाही हे पाहणे बाकी आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य चिकित्सक डॉ देवाशिष चौधरी म्हणाले की, इबादत सहा आठवड्यांपासून दुखापतीतून बरे होण्याची प्रक्रिया मध्ये आहे. या काळात आम्ही त्याचे अनेक वेळा एमआरआय केले पण तो दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही.

आशिया कपसाठी बांगलादेश संघ:

शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, मेहदी हसन, मोहम्मद नईम, शमीम हुसेन, मोहम्मद हसन. तनजीद हसन आणि तंजीम हसन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.