Asia Cup 2023 : आशिया कपच्या 3 दिवस आधी संघावर कोसळला संकटाचा डोंगर! दिग्गज खेळाडूची अचानक बिघडली तब्येत

Asia Cup 2023 Bangladesh opener Liton Das News
Asia Cup 2023 Bangladesh opener Liton Das News
Updated on

Asia Cup 2023 Bangladesh opener Liton Das News : आशिया कप 2023 सुरू होण्यासाठी फक्त तीन दिवस राहिले आहे, पण त्या आधी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेश संघाला स्पर्धेतील पहिला सामना 31 ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे, परंतु त्याआधी बांगलादेश क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडूची तब्येत अचानक बिघडली आहे.

Asia Cup 2023 Bangladesh opener Liton Das News
World Athletics Championships: भारतीय रिले टीमने रचला इतिहास! सर्व आशियाई संघांचे विक्रम मोडत गाठली अंतिम फेरी

बांगलादेश क्रिकेट संघासाठी आशिया कप 2023 पूर्वीची ही सर्वात वाईट बातमी आहे. बांगलादेशचा स्टार ओपनिंग बॅट्समन लिटन दास आजारी पडला आहे. लिटन दासची गणना बांगलादेश क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. लिटन दासच्या अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे बांगलादेश क्रिकेट संघाची चिंता वाढली आहे.

बांगलादेशचा स्टार ओपनिंग बॅट्समन लिटन दास आजारी आहे. त्यामुळे रविवारी श्रीलंकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तो टीमसोबत बसू शकला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Asia Cup 2023 Bangladesh opener Liton Das News
Wanindu Hasaranga : बहिणीच्या लग्नात आरसीबीच्या स्टार खेळाडू ढसाढसा रडला, व्हिडिओ व्हायरल

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या क्रिकेट सुकाणू समितीचे अध्यक्ष जलाल युनूस म्हणाले, 'बांगलादेशचा सलामीचा फलंदाज लिटन दासला ताप आला आहे. मात्र, लिटन दासची डेंग्यू टेस्ट नार्मल आली आहे. जर लिटन दास लवकर बरा झाला, तर तो पुढील विमानाने श्रीलंकेला जाईल, पण जर तो बरा झाला नाही, तर आपल्याला त्याच्या बदलीचा विचार करावा लागेल. बांगलादेशचा आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना 31 ऑगस्ट रोजी पल्लेकेले येथे श्रीलंकेशी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.