Asia Cup 2023 : संघाला मोठा धक्का! आता 'हा' स्टार खेळाडू आशिया कपपूर्वी झाला जखमी

 Asia Cup 2023
Asia Cup 2023sakal
Updated on

Asia Cup 2023 Dilshan Madushanka News : आशिया कप 2023 यावेळीस पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या भूमीवर खेळल्या जाणार आहे. आशिया कप स्पर्धेसाठी श्रीलंका वगळता सर्व संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्याच वेळी श्रीलंकेचे स्टार खेळाडू दुस्मंथा चमीरा आणि वानिंदू हसरंगा जखमी झाले आहेत. कुसल परेरा आणि अविष्का फर्नांडो कोविड -19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. आता आशिया कपच्या काही दिवस आधी श्रीलंकेचा आणखी एक स्टार खेळाडू जखमी झाला आहे.

 Asia Cup 2023
R Praggnanandhaa : आनंद महिंद्रा ग्रँडमास्टर प्रग्नानंदला भेट म्हणून देणार इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून बसेल धक्का...

श्रीलंकेच्या आशिया कपच्या तयारीला आणखी एक धक्का बसला आहे, कारण त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका दुखापतग्रस्त झाला आहे. श्रीलंका क्रिकेटच्या वैद्यकीय समितीचे अध्यक्ष अर्जुन डी सिल्वा यांनी ESPNcricinfo ला सांगितले की, शुक्रवारच्या सराव सामन्यात मधुशंकाला दुखापत झाली होती. विश्वचषकापूर्वी तो फिटनेस परत मिळवू शकणार नाही.

 Asia Cup 2023
Asia Cup 2023 : 'दडपण घेणार नाही, पण पुढील दोन महिने...', आशिया कपआधी कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य

वृत्तानुसार, दुखापतीमुळे दुस्मंथा चमीराला आशिया कपलाही मुकावे लागणार आहे. लेग-स्पिनर वानिंदू हसरंगा देखील मांडीच्या दुखापतीतून सावरत आहे आणि वृत्तानुसार त्यालाही आशिया कप स्पर्धेतील काही सामने मुकण्याची शक्यता आहे.

लाहिरू कुमारा, दुस्मंथा चमीरा आणि मधुशंका या त्रिकुटाने जून आणि जुलैमध्ये विश्वचषक पात्रता फेरीत चांगली कामगिरी केली आणि संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.

स्टार वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीत श्रीलंकेला कासुन रजिथा, प्रमोद मदुशन आणि मतिशा पाथिराना यांच्यावर अवलंबून राहावे लागेल. तर त्यांच्याकडे वानिंदू हसरंगाच्या जागी दुनिथ वेलालागे आणि दुशन हेमंता हे पर्याय आहेत. श्रीलंका 31 ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्ध आशिया कपच्या मोहिमेला सुरुवात करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.