Asia Cup 2023 : पाकिस्तानच्या चाचूने वाढवले भारताचे टेन्शन, मैदान अन् प्रेस कॉन्फरन्स दोन्ही गाजवलं

Asia Cup 2023 Iftikhar Ahmed
Asia Cup 2023 Iftikhar Ahmedesakal
Updated on

Asia Cup 2023 Iftikhar Ahmed : आशिया कप 2023 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने नवख्या नेपाळचा 238 धावांनी पराभव केला. तब्बल 15 वर्षानंतर आशिया कपचे सामने पाकिस्तानमध्ये होत आहेत. मुल्तानवर झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 342 धावा केल्या होत्या.

पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 151 धावांची दीडशतकी खेळी केली. त्याला इफ्तिकार अहमदने नाबाद 109 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 214 धावांची दमदार भागीदारी रचली.

विशेष म्हणजे इफ्तिकार अहमदचे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक होते. पाकिस्तान संघात चाचू नावाने प्रसिद्ध असलेल्या इफ्तिकार भारतासाठी देखील डोकेदुखी ठरू शकतो.

Asia Cup 2023 Iftikhar Ahmed
US Open 2023 : प्रचंड उकाडा अन् घामांच्या धारा... आव्हानात्मक सामन्यात जोकोविच, स्वियातेक यांचा सरळ सेटमध्ये विजय

सामना जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत इफ्तिकारने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. याचबरोबर त्याने पाकिस्तान संघातील चाचू (काका) आणि भतिजा (पुतणा) कोण असल्याचे देखील उघड केले. पत्राकराने भागिदारी संदर्भात इफ्तिकारला विचारले संघातील खेळाडू आणि चाहते सहसा चाचा कोणाला म्हणतात अन् भतिजा कोणाला म्हणतात असं विचारलं.

इफ्तिकार म्हणाला की, 'पुतण्याने देखील काकाला कॉन्फिडन्स दिला. आणि काकाने देखील पुतण्याला कॉन्फिडन्स दिला. बाबर हा जगातील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. तो स्ट्राईक रोटेशन ज्या पद्धतीने हाताळतो त्याने प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण होतो. आम्ही फलंदाजी करताना खूप मजा आली.'

Asia Cup 2023 Iftikhar Ahmed
BCCI Media Rights : प्रसारण हक्क अंबानींच्या खिशात! डिज्ने स्टारला मागं टाकत व्हायकॉम 18 ने बाजी मारली

पाकिस्तानने नेपाळवर विजय मिळवत आशिया कपची दमदार सुरूवात केली आहे. आता त्यांचा मुकाबला हा श्रीलंकेत भारतासोबत होणार आहे. आशिया कप हा हायब्रीड पद्धतीने खेळवला जाणार आहे. पाकिस्तानमध्ये चार सामने तर उर्वरित सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्याने हा मध्यम मार्ग काढण्यात आला आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.