IND vs NEP Asia Cup: टीम इंडियाची सुपर 4 मध्ये एट्री! नेपाळचा 10 गडी राखून पराभव, रोहित-शुबमनचे अर्धशतक

IND vs NEP Asia Cup
IND vs NEP Asia Cup
Updated on

Asia Cup 2023 India Vs Nepal Score : आशिया कप 2023 मध्ये भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम श्रीलंका येथे खेळला गेला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेपाळने प्रथम फलंदाजी करत 230 धावा केल्या. मात्र, पावसामुळे भारताला डकवर्थ लुईस पद्धतीनुसार 23 षटकांत 145 धावांचे लक्ष्य मिळाले. टीम इंडियाने 20.1 षटकात एकही विकेट न गमावता हे लक्ष्य गाठले.

IND vs NEP Asia Cup: टीम इंडियाची सुपर 4 मध्ये एट्री! नेपाळचा 10 गडी राखून पराभव, रोहित-शुबमनचे अर्धशतक

भारत आणि नेपाळ यांच्यातील हा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता. नेपाळला हरवून भारतीय संघ सुपर फोरमध्ये पोहोचला आहे.

IND vs NEP Asia Cup Live: कर्णधार रोहितने चौकार मारत ठोकले अर्धशतक! भारताला 60 चेंडूत 49 धावांची गरज

कर्णधार रोहित शर्माने 39 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने सोमपाल कामीच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 49 वे अर्धशतक होते. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या एकही विकेट न गमावता 96 धावा आहे. भारताला 60 चेंडूत 49 धावांची गरज आहे.

पावसाच्या व्यत्ययानंतर भारत विरुद्ध नेपाळ सामन्याला सुरुवात,२३ षटकांमध्ये पुर्ण करावं लागेल लक्ष्य

भारताचा डाव सुरु झाल्यावर २.१ षटकांनंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. आता खेळाला पुन्हा सुरुवात होणार आहे. २३ षटकात भारताला जिंकण्यासाठी १४५ धावांचे लक्ष्य मिळालं आहे.

लंकेत मुसळधार पाऊस! षटके कमी केल्यानंतर भारताला किती मिळणार DLS लक्ष्य?

मुसळधार पाऊस पडत आहे आणि संपूर्ण मैदान कव्हरने झाकले आहे. इथून पुढे षटक कमी होणार केल्या जाणार आहे.

  • 45 षटकात 220 धावा

  • 40 षटकात 207 धावा

  • 35 षटकात 192 धावा

  • 30 षटकात 174 धावा

  • 20 षटकात 130 धावा

IND vs NEP Asia Cup Live: पावसामुळे पुन्हा खेळ थांबला! भारतसमोर 231 धावांचे लक्ष्य

पावसामुळे पुन्हा एकदा खेळ थांबवावा लागला आहे. भारताने 2.1 षटकात एकही विकेट न गमावता 17 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित शर्मा 4 धावा आणि शुभमन गिल 12 धावा करत क्रीजवर आहे. नेपाळने 231 धावांचे लक्ष्य दिले आहे.

IND vs NEP Asia Cup Live: नेपाळच्या संघाने भारतीय संघाचा फोडला घाम! 231 धावांचे दिले लक्ष्य

नेपाळने भारताला 231 धावांचे लक्ष्य दिले आहे. नेपाळ संघाला ऑलआऊट करण्यासाठी भारताला 48.2 षटके लागली. नेपाळच्या संघाने भारतीय गोलंदाजांना घाम फोडला आणि 230 धावा केल्या.

भारताकडून रवींद्र जडेजा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी नेपाळकडून आसिफ शेखने 58 धावा आणि सोमपाल कामीने 48 धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारतीय गोलंदाजांची ही कामगिरी पाहता वर्ल्ड कप जिंकण्याच्या टीम इंडियाच्या शक्यतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

IND vs NEP Asia Cup Live: पाऊस थांबल्यानंतर खेळ सुरू..., नेपाळला सातवा धक्का!

नेपाळला 42 व्या षटकात 194 धावांवर सातवा धक्का बसला. दीपेंद्र सिंगला 25 चेंडूत 29 धावा करता आल्या. दीपेंद्र आणि सोमपाल यांनी सातव्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. नेपाळची धावसंख्या 42 षटकांत 7 बाद 194 अशी आहे.

IND vs NEP Asia Cup Live: पाऊस थांबला! अंपायरने घेतला हा निर्णय, कधी सूरू होणार भारत अन् नेपाळ सामना

पाऊस थांबला आहे. कव्हर काढले जात आहेत. काही वेळात सामना सुरू होऊ शकते.

IND vs NEP Asia Cup Live: पावसामुळे खेळ थांबला!

लंकेत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. भारत आणि नेपाळ सामना कधी सूरू होणार हे आता तरी माहिती नाही. नेपाळची धावसंख्या 37.5 षटकांनंतर सहा विकेट्सवर 178 धावा आहे. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजला दोन आणि शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. नेपाळकडून आसिफ शेखने सर्वाधिक ५८ धावा केल्या आहेत. कुशल भुरटेल ३८ धावा करून बाद झाला. दीपेंद्र 20 चेंडूत 27 धावा तर सोमपाल 20 चेंडूत 11 धावा करत खेळत आहे.

नेपाळला सहावा धक्का

नेपाळला 32 व्या षटकात 144 धावांवर सहावा धक्का बसला आहे. सिराजने गुलशनला बाद केले. त्याला 35 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 23 धावा करता आल्या.

 लंकेत 'सर' जडेजाने घातला धुमाकूळ, नेपाळचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये

नेपाळला 30व्या षटकात 132 धावांवर पाचवा धक्का बसला. सिराजने आसिफ शेखला बाद केले. आसिफने शानदार फलंदाजी केली आणि 97 चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने 58 धावा करून बाद झाला.

आसिफ शेखचे अर्धशतक

नेपाळचा सलामीचा फलंदाज आसिफ शेखने आपल्या वनडे कारकिर्दीतील नववे अर्धशतक झळकावले. त्याने 88 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. नेपाळची धावसंख्या 28 षटकांत 4 बाद 123 अशी आहे.

नेपाळला चौथा धक्का

नेपाळला 22 व्या षटकात 101 धावांवर चौथा धक्का बसला. जडेजाने कुशल मल्लाला सिराजकरवी झेलबाद केले. जडेजाचे हे तिसरे यश ठरले. नेपाळची धावसंख्या 23 षटकांत 4 बाद 102 अशी आहे.

  लंकेत जडेजाची कमाल! कर्णधार रोहितला पाठवले तंबूत

नेपाळला 20 व्या षटकात 93 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजाने नेपाळ कर्णधार रोहित पौडेलला स्लिपमध्ये झेलबाद करत तंबूत पाठवले. पौडेलला आठ चेंडूत पाच धावा करता आल्या. नेपाळची 20 षटकांत 3 बाद 93 धावा.

IND vs NEP Asia Cup Live: नेपाळला दूसरा धक्का! जडेजाने भीमला पाठवले पॅव्हेलियन 

नेपाळची दुसरी विकेट पडली आहे. जडेजाने भीम शार्कीला पॅव्हेलियन पाठवले.

IND vs NEP Asia Cup Live: शार्दुलने दिला नेपाळला पहिला धक्का! भारताकडून खराब फील्डिंग

10व्या षटकात 65 धावा असताना नेपाळला पहिला धक्का बसला आहे. शार्दुल ठाकूरने कुशल भुरटेलला झेलबाद केले. त्याने 25 चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 38 धावांची खेळी केली.

भारतीय संघाची खराब फील्डिंग! श्रेयस-कोहली अन् इशानने सोडले सोपे झेल, नेपाळची आक्रमक सूरुवात

पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने स्लिपमध्ये सोपा झेल सोडला. यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोहलीने कव्हर पॉइंटवर सोपा झेल सोडला.

पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यष्टिरक्षक इशान किशनने सोपा झेल सोडला. भारतीय संघाने नेपाळच्या सलामीवीरांना तीन जीवदान दिले आणि आजपर्यंत त्यांना एकही विकेट सोडता आलेली नाही. ८ षटकांनंतर नेपाळची धावसंख्या एकही विकेट न गमावता ४२ धावा आहे.

भारताने 2 चेंडूत 2 सोडले झेल, नेपाळी सलामीवीरांना मिळाले जीवदान

भारतीय संघाचे खराब क्षेत्ररक्षण करत आहे. पहिल्या दोन षटकात श्रेयस-कोहलीने दोन चेंडूत दोन सोपे झेल सोडले आहेत.

जाणून घ्या दोन्ही संघाची Playing -11 

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलसन झा, दीपेंद्र सिंग आयरे, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी, ललित राजबंशी.

IND vs NEP Asia Cup Live: महत्वपूर्ण सामन्यात भारताने जिंकले नाणेफेक! घेतला हा निर्णय; जाणून घ्या Playing -11

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो म्हणाला की, प्रथम गोलंदाजी करण्याचे विशेष कारण नाही. गेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि या सामन्यात त्यांना प्रथम गोलंदाजी करून गोलंदाजांचा सराव करायचा आहे.

IND vs NEP Asia Cup Live: पावसामुळे सामना रद्द झाला तर सुपर-4 मध्ये कोण जाणार?

सामना न खेळता टीम इंडिया सुपर-4 मध्ये? कँडीतून मिळाले संकेत, जाणून घ्या गणित

(सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.