Ind vs Pak : पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी बुमराह पोहोचला श्रीलंकेत, कोण होणार प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर?

Asia Cup 2023 ind vs pak Jasprit Bumrah Joins Indian Team
Asia Cup 2023 ind vs pak Jasprit Bumrah Joins Indian Team
Updated on

IND vs PAK Asia Cup 2023 : आशिया कप 2023 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी पुन्हा एकदा मंच तयार झाला आहे. 10 सप्टेंबरला दोन्ही संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलंबोमध्ये होणार आहे, परंतु सामन्यावर पावसाचे सावट आहे. पाऊस पडेल की नाही हा भाग वेगळा, पण तयारी शिगेला पोहोचली आहे.

दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह पुन्हा श्रीलंकेत पोहोचला आहे आणि आपल्या संघात सामील झाला आहे.

Asia Cup 2023 ind vs pak Jasprit Bumrah Joins Indian Team
Ind vs Pak : राखीव दिवशीही मुसळधार पाऊस, सुपर 4 मध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर काय होणार?

जसप्रीत बुमराहला पुत्ररत्न प्राप्त झाले, त्यासाठी तो भारतात गेला होता. यामुळेच तो 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. पण रविवारी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सुपर 4 सामन्यासाठी तो शुक्रवारी सकाळी कोलंबोला पोहोचला.

आज संध्याकाळी जसप्रीत बुमराह आर प्रेमदासा स्टेडियमवर सराव सत्रासाठी त्याच्या संघात सामील होईल आणि तयारीला अंतिम रूप देईल. मात्र, कोलंबोमध्ये पावसाची चर्चा आहे, त्यामुळे इनडोअर स्टेडियममध्ये सराव केला जात आहे.

Asia Cup 2023 ind vs pak Jasprit Bumrah Joins Indian Team
WC 2023 Gold Ticket : क्रिकेटचा देवाला मिळाले वर्ल्डकपचे 'गोल्डन तिकीट', बीसीसीआयने शेअर केला खास फोटो

जसप्रीत बुमराह जवळपास वर्षभरानंतर टीम इंडियात परतला आहे. त्याने आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळली, ज्यामध्ये तो कर्णधारही होता. मात्र त्याने अद्याप वनडेत गोलंदाजी केलेली नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, पण पावसामुळे भारतीय संघ तिथे गोलंदाजी करू शकला नाही.

यानंतर तो नेपाळ सामन्यात खेळताना दिसला नाही. आता पाकिस्तानविरुद्ध दीर्घ कालावधीनंतर प्रथमच तो आपली ताकद दाखवणार आहे. पण आता प्रश्न आहे की जसप्रीत बुमराह पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये आला तर कोणता खेळाडू बाहेर जाणार आहे.

पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर नेपाळविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी खेळला होता. त्या सामन्यात शमीने सात षटकांत 29 धावा देत एक विकेट घेतली होती. तर मोहम्मद सिराजने 9.3 षटकात 61 धावा देत तीन बळी घेतले.

शार्दुल ठाकूरने चार षटकांत 26 धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अशा परिस्थितीत मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांच्यापैकी कोणाला तरी बाहेर जावे लागेल, जेणेकरून जसप्रीत बुमराहला टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकेल. मात्र, कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक झाल्यावरच याचा खुलासा करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.