Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया कपमधून मोठी बातमी! भारत-पाकिस्तान सामना रद्द

Asia Cup 2023 India vs Pakistan
Asia Cup 2023 India vs Pakistansakal
Updated on

Asia Cup 2023 India vs Pakistan : या वर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या एकदिवसीय आशिया चषकाबाबत भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळातील वाद संपला आहे. दुसरीकडे शुक्रवारी विश्वचषकासाठी सरकारच्या परवानगीला पीसीबीकडून कात्री लावली जात आहे.

दरम्यान, हाँगकाँगमध्ये सुरू असलेल्या महिला इमर्जिंग आशिया चषकातून मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. स्थानिक वेळेनुसार हा सामना शनिवारी दुपारी 1.30 वाजता सुरू होणार होता, मात्र हा सामना होऊ शकला नाही.

Asia Cup 2023 India vs Pakistan
BAN vs AFG : भारत-पाकला जमलं नाही, ते बांग्लादेशने करून दाखवलं, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

या स्पर्धेत नेपाळ, हाँगकाँग आणि पाकिस्तानसह भारतीय संघ अ गटात आहे. भारतीय संघाने हाँगकाँगविरुद्धचा पहिला सामना 9 गडी राखून जिंकला होता. त्यानंतर त्यांचा नेपाळविरुद्धचा सामना पावसाने व्यत्यय आणला आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शनिवारी होणारा सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचे 1-1 गुण झाले. ग्रुप स्टेजमधील हा शेवटचा सामना होता.

Asia Cup 2023 India vs Pakistan
Team India: लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIचा मास्टर प्लॅन! 5 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूची भारतीय कसोटी संघात एन्ट्री

आता अ गटातून भारत आणि पाकिस्तान 4-4 गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे ब गटातून श्रीलंका आणि बांगलादेशने 4-4 गुणांसह अंतिम 4 मध्ये स्थान मिळविले. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे तर पाकिस्तान बांगलादेशशी भिडणार आहे.

दोन्ही सामने 19 जून रोजी होणार आहेत. यानंतर उपांत्य फेरीतील दोन्ही विजेते संघ 21 जून रोजी अंतिम फेरीत आमनेसामने येतील. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होण्याची शक्यता अजूनही कायम आहे.

Asia Cup 2023 India vs Pakistan
Steve Smith Business : स्मिथने 54 कोटींचे केले 101 कोटी! वॉर्नरही उतरणार याच व्यवसायात?

विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत पावसाचा व्यत्यय आला होता. गटातील 12 सामन्यांपैकी फक्त 5 सामने होऊ शकले आहेत तर पावसामुळे 7 सामने वाहून गेले आहेत. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या चार संघांनी प्रत्येकी एकच सामना खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.