Ind vs Pak : 'नाणेफेकीच्या 5 मिनिटे आधी...', सामना जिंकल्यानंतर KL राहुल बाबत कर्णधारचे मोठे वक्तव्य

Ind vs Pak Asia Cup 2023 Rohit Sharma's Reaction
Ind vs Pak Asia Cup 2023 Rohit Sharma's Reaction
Updated on

Ind vs Pak Asia Cup 2023 Rohit Sharma's Reaction : आशिया कप 2023 च्या सुपर-4 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली.

टीम इंडियाने 228 धावांनी विजय मिळवला, हा पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. या विजयानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा खूप आनंदी दिसत होता. यादरम्यान कर्णधार रोहित शर्माने KL राहुल बाबत मोठे वक्तव्य केले.

Ind vs Pak Asia Cup 2023 Rohit Sharma's Reaction
Asia Cup 2023 Points Table: पॉइंट टेबलमध्ये भारताची उसळी! पाकिस्तानला मोठा धक्का, जाणून घ्या कोण आहे कुठे

सामन्यानंतर रोहित शर्माने ग्राउंड्समनचे आभार मानले, आणि म्हणाला की, “आम्हाला मैदानात उतरायचे होते जेणेकरून आम्हाला खेळण्यासाठी थोडा वेळ मिळेल. ग्राउंड्समनच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. मला माहित आहे की संपूर्ण मैदान कव्हर करणे किती कठीण आहे आणि ते झाकले गेले. संपूर्ण टीमच्या वतीने मी त्यांचे आभार मानू इच्छितो.”

Ind vs Pak Asia Cup 2023 Rohit Sharma's Reaction
Virat Kohli : मी तो शॉट खेळताना खूप... अखेर विराटने सांगितलंच 'तो' ऐतिहासिक फटका का खेळला?

रोहित शर्मा पुढे म्हणाला की, 'आम्ही सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यात आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी होत्या. ही कोहलीची टिपिकल खेळी होती हे आम्हाला माहीत आहे. त्याने आपली भूमिका चोखपणे मांडली. केएलसाठी खूप आनंद झाला. कारण शेवटच्या क्षणी त्याला संघात घेतले. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नाही. नाणेफेकीच्या पाच मिनिटे आधी, आम्हाला केएल राहुलला सांगितले की तू खेळणार आहे. अशा परिस्थितीत सामन्यात अशी खेळी खेळणे खरोखर आश्चर्यकारक आहे.

Ind vs Pak Asia Cup 2023 Rohit Sharma's Reaction
India Vs Pakistan : कुलदीपचा ड्रीम स्पेल! भारताचा पाकिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा वनडे विजय

टीम इंडियाच्या गोलंदाजीवर रोहितही खूश दिसत होता. त्याने जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवचे खूप कौतुक केले. रोहित म्हणाला, बुमराह खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग केला. गेल्या 8-15 महिन्यांत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. अशा दुखापतीनंतर पुनरागमन करणे किती कठीण असते हे मला माहीत आहे. बुमराह सध्या २७ वर्षांचा आहे. त्याचे पुनरागमन आणि अशी गोलंदाजी करणे हे बुमराह काय आहे हे दर्शवते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.