Asia Cup 2023 Ind vs Pak Super Four Team India Playing 11 : 10 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची लढत पाहिला मिळणार आहे. कारण ग्रुप स्टेजनंतर हे दोन संघ सुपर 4 मध्ये भिडणार आहेत. हा सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक दुपारी 2.30 वाजता होईल. हा महान सामना कोलंबो मध्ये खेळला जाणार आहे.
टीम इंडिया कोणत्याही किंमतीवर हा सामना जिंकण्याचा आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये मोठा बदल करून संघातून दोन खेळाडूंचा पत्ता कट करू शकतो. हे दोन खेळाडू दुसरे कोणी नसून श्रेयस अय्यर आणि मोहम्मद शमी असू शकतात.
कर्णधार रोहित शर्मा मोहम्मद शमी आणि श्रेयस अय्यरला प्लेइंग 11 मधून वगळू शकतो हे लक्षात घेण्यासारखे आहे. अय्यरला वगळण्यामागील कारण म्हणजे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. अय्यरच्या बॅटमधून केवळ 14 धावा आल्या.
यासोबतच मोहम्मद शमीबाबत एक बदल होऊ शकतो. जसप्रीत बुमराह परतणार असल्याने शमी बाहेर जाईल. यासोबतच नेपाळविरुद्ध या गोलंदाजाची गोलंदाजी अतिशय सामान्य होती. त्याने 7 षटकात 42 धावा दिल्या आणि फक्त 1 विकेट घेतला. अशा स्थितीत दोघेही बाहेर जाणार हे निश्चित दिसत आहे.
केएल राहुलचे पाकिस्तानविरुद्ध पुनरागमन शक्य आहे. या सामन्यासाठी राहुलने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली असून तो श्रीलंकेलाही पोहोचला आहे. अशा स्थितीत राहुल यष्टिरक्षक म्हणून खेळणार हे निश्चित आहे. दुसरीकडे, बाकीच्या संघावर नजर टाकली तर शुभमन गिल आणि रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना दिसतील. रोहितने आतापर्यंत 85 तर गिलने 77 धावा केल्या आहेत.
त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, चौथ्या क्रमांकावर इशान किशन ज्याने पाकिस्तानविरुद्ध 82 तर हार्दिक पांड्याने 87 धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांचा संघात समावेश होऊ शकतो.
भारताची संभाव्य प्लेइंग 11:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.