Asia Cup 2023 India Vs Pakistan : कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर रविवारी आशिया कपच्या सुपर-4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाने चांगली सुरुवात करून 24.1 षटकात 2 गडी गमावत 147 धावा केल्या, त्यानंतर पावसामुळे खेळ खराब झाला. त्यानंतर सामना सुरू होऊ शकला नाही. आता हा सामना सोमवारी (11 सप्टेंबर) पूर्ण होणार आहे.
आशिया कप मध्ये यावेळी फक्त दोन सामन्यांसाठी राखीव दिवस आहे, त्यापैकी एक हा सामना आहे. या भारत-पाकिस्तान सामन्याशिवाय अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस देखील ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज जिथे सामना थांबवण्यात आला होता त्याच ठिकाणाहून सोमवारी दोन्ही संघ खेळायला सुरुवात करतील. भारतीय संघ 24.1 षटकांपासून खेळण्यास सुरुवात करेल. हा सामना फक्त 50-50 षटकांचा असेल.
राखीव दिवशी सामना पूर्ण झाला नाही तर काय होईल?
सोमवार (११ सप्टेंबर) हा या सामन्याचा राखीव दिवस आहे. राखीव दिवशीही सामना पूर्ण झाला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिली जाईल. सामना रद्द घोषित केला जाईल. मग भारताच्या खात्यात एक गुण जमा होईल. त्याचबरोबर पाकिस्तानचे दोन सामन्यांत तीन गुण होतील.
सुपर-4 मधील पॉइंट टेबलची काय आहे स्थिती?
सुपर-4 च्या पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान पहिल्या स्थानावर आहे. त्याचे एका सामन्यात दोन गुण आहेत. पाकिस्तानचा निव्वळ रनरेट +1.051 आहे. श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचेही एका सामन्यात दोन गुण आहेत, मात्र नेट रनरेटमध्ये ते पाकिस्तानच्या मागे आहे. श्रीलंकेचा निव्वळ धावगती +0.420 आहे. भारत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याला अजून पहिला सामना खेळायचा आहे. बांगलादेशचा संघ गुणतालिकेत तळाशी आहे. त्याचे दोन सामन्यांत शून्य गुण आहेत. त्याने दोन्ही सामने गमावले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.