Asia Cup 2023 IND vs PAK : 10 सेकंदासाठी 30 ते 40 लाख! आशिया कपच्या एकाच सामन्यात डिज्ने - स्टार होणार मालामाल

Asia Cup 2023 IND vs PAK
Asia Cup 2023 IND vs PAK esakal
Updated on

Asia Cup 2023 IND vs PAK : वर्ल्डकपची रंगीत तालीम म्हणून खेळवला जाणारा यंदाचा आशिया कप हा आजपासून (30 ऑगस्ट) सुरू झाला आहे. यंदाच्या आशिया कपमध्ये सर्वात हाय व्होल्टेज सामना हा भारत पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 2 सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांना वर्ल्डकपपूर्वी प्रतिस्पर्ध्यांची ताकद आजमावण्याची संधी मिळाली आहे.

मात्र संधी जरी या दोन संघाना असली तरी सोनं मात्र डिज्ने हॉटस्टारचं होणार आहे. भारत - पाकिस्तान सामन्यावेळी दोन्ही देशातील संपूर्ण जनता ही टीव्ही, मोबाईलसमोर असणार यात काही शंका नाही. याचाच फायदा उचलण्याची जय्यत तयारी हॉटस्टारने केली आहे. त्यांनी या सामन्यादरम्यान जाहिरातीतून तब्बल 400 कोटी रूपये कमवण्याचा चंग बांधला आहे.

Asia Cup 2023 IND vs PAK
PAK vs NEP Asia Cup : नेपाळ पहिल्यांदाच आशिया कपसाठी मैदानात! पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला हा निर्णय

आशिया कपमध्ये ग्रुप A मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान दोनवेळा तरी लढत होईल अशी अपेक्षा आहे. या सामन्यासाठी डिज्ने स्टारने कोको कोला, अमुल, मॅकनोरे, नेरोलॅक पेंट, बर्जर पेंट या मोठ्या ब्रँडसोबत डील फायनल केली आहे. डिज्ने स्टारने जाहिरातदारांना आकर्षित करण्यासाठी नवी रणनिती देखील आखली होती. याचा त्यांना फायदा झाला आहे.

लाईव्ह मिंटने दिलेल्या माहितीनुसार आशिया कप 2023 चे सामने आणि वर्ल्डकप 2023 च्या सामन्यांसाठी डिज्ने स्टारने जाहिरातदारांसाठी तीन पॅकेजची ऑफर दिली आहे.

  • पॅकेज A - इतर सामन्यासह भारत - पाकिस्तान सामना.

  • पॅकेज B - दुसरा भारत - पाकिस्तान सामना आणि इतर सामने.

  • पॅकेज C - संपूर्ण स्पर्धा.

Asia Cup 2023 IND vs PAK
World Cup 2023 Ticket : 'भारतीय संघात निवड होणं यापेक्षा सोपं'... BCCI च्या भोंगळ कारभारामुळे चाहते 12 तास 'रांगेत'

माध्यम कंपनीतील एका उच्च अधिकाऱ्याने लाईव्ह मिंटला सांगितले की, 'दोन्ही स्पर्धांसाठी बराच पैसा खर्च करण्यात येणार आहे. आशिया कपवर थोडा कमी पैसा खर्च होईल मात्र ही वर्ल्डकपची पूर्वतयारी असेल. स्पॉन्सर आणि स्पॉट बायर डिज्ने स्टार जवळपास 350 कोटी रूपये कमवण्याची शक्यता आहे. सध्याच्या मार्केटची अवस्था पाहता ही काही वाईट कमाई नाही.'

आशिया कप स्पॉन्सर : थम्स अप (कोका-कोला), अमुल, मॅकनॉरे, नरोलॅक पेंट, बर्जर पेंट, जिंदाल पँथर, सॅमसन मोबाईल, एमआरएफ टायर्स, मारूती सुझुकी, अमॅझॉन पे, माय 11 सर्कल, पॉलिसी बाझार, आयसीआयसीआय म्युचअल फंड.

आधी इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार डिज्ने स्टारने भारत - पाकिस्तान सामन्यासाठीचा 10 सेकंदाचा जाहिरातीचा स्लॉट हा 30 लाख रूपयाला विकला आहे. याचबरोबर दुसऱ्या सामन्यांसाठी 10 सेकंदासाठी 2 ते 3 लाख रूपये दर ठेवला आहे.

डिज्ने स्टारने भारत पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग हे मोफत होणार आहे. त्यामुळे डिज्ने स्टारला त्यांच्या प्रेक्षक संख्येत प्रचंड मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.