Asia Cup 2023 IND vs PAK : भारत - पाकिस्तान सामन्यात खेळाडूंनीच नाही तर डिज्ने हॉटस्टारनेही केलं मोठं रेकॉर्ड

Asia Cup 2023 IND vs PAK : भारत - पाकिस्तान सामन्यात खेळाडूंनीच नाही तर डिज्ने हॉटस्टारनेही केलं मोठं रेकॉर्ड
Updated on

Asia Cup 2023 IND vs PAK : आशिया कप 2023 मधील सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना झाला. या सामन्यात पावसासोबतच भारतीय फलंदाजांनी देखील धुवांधार बॅटिंग केली. भारताने 356 धावांचा डोंगर उभारला.

त्यानंतर कुलदीप यादवच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ 128 धावात गारद झाला. कुलदीपने 5 विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने सामना 228 धावांनी जिंकून पाकिस्तानवर इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय साजरा केला.

भारतासोबतच या हाय व्होल्टेज सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणाऱ्या डिज्ने हॉटस्टारने देखील रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक संख्या कमावली. याबाबतची माहिती बीसीसीआय आणि एशियन क्रिकेट काऊन्सीलचे सचिव जय शहा यांनी दिली. जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे दोन दिवसात संपलेला भारत - पाकिस्तान एकदिवस सामना जवळपास 2.8 कोटी लोकांनी डिज्ने हॉटस्टारवर लाईव्ह पाहिला.

जय शहा यांनी ट्विट केले की, 'आज भारत - पाकिस्तान सामना डिज्ने प्लस हॉटस्टारवर 2.8 कोटी लोकं डिजीटली लाईव्ह पाहत होती. यापूर्वी 2019 च्या वर्ल्डकपचा भारत आणि न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यावेळी 2.52 कोटी लोकं लाईव्ह होती. ते रेकॉर्ड आता मोडलं आहे.'

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय सलामी जोडी रोहित शर्मा आणि शुभमन गिलने 121 धावांची दमदार सलामी देत त्याचा हा निर्णय खोटा ठरवला. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला. त्यावेळी विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तानला एकही विकेट घेण्याची संधी न देता तिसऱ्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी रचली.

विराट कोहलीने आक्रमक 122 धावा केल्या. तर जवळपास 5 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या केएल राहुलने पाकिस्तान विरूद्ध 111 धावांची शतकी खेळी करत आपला फॉर्म आणि फिटनेस दोन्ही सिद्ध करून दाखवला. भारताने पाकिस्तानसमोर 356 धावांचा डोंगर उभारल्यानंतर कुलदीप यादवने भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव 128 धावात संपुष्टात आणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.