Asia Cup 2023 India and Pakistan called off due to rain : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2023 चा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात विजय हुकला होता, तर पाकिस्तानही सुपर फोरसाठी पात्र ठरला आहे.
कँडी मध्ये पावसाचा अंदाज 2-3 दिवस आधीच वर्तवला जात होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 266 धावा केल्या, परंतु पाकिस्तानची फलंदाजी सुरू होऊ शकली नाही, सुमारे दोन तास प्रतीक्षा केल्यानंतरही परिस्थिती योग्य नसताना सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघाना 1-1 गुण दिला आहे.
किशन-पांड्या भारतासाठी चमकले
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा निर्णय झाला नाही, पण भारतीय डावात किशन आणि पांड्याने चांगली फलंदाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची शतकी भागीदारी केली, यासोबत त्याने टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सामन्यादरम्यान टीम इंडियासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना इशान किशनने 81 चेंडूत 82 धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पांड्याने 90 चेंडूत 87 धावा केल्या.
सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पाकसाठी शाहीन शाह आफ्रिदीने 10 षटके टाकताना 35 धावा खर्च करून सर्वाधिक चार यश मिळवले. तर नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. या तीन गोलंदाजांशिवाय शादाब खान, मोहम्मद नवाज आणि आगा सलमान यांनीही गोलंदाजी केली. मात्र, या गोलंदाजांना यश मिळाले नाही.
10 तारखेला पुन्हा मिळणार संधी?
भारताविरुद्धचा सामना रद्द होऊनही पाकिस्तानचा संघ सुपर-4 मध्ये पोहोचला आहे. पाक टीमने पहिल्या सामन्यात नेपाळवर 238 धावांनी मोठा विजय मिळवला होता. टीम इंडियालाही सुपर-4 मध्ये पोहोचण्याची सुवर्णसंधी आहे, कारण ब्लू टीमचा पुढचा सामना 4 सप्टेंबरला नेपाळसोबत आहे. जर भारताने नेपाळचा पराभव केला तर 10 तारखेला सुपर - 4 मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.