पल्लिकेले : क्रिकेट जगताला भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीची प्रतीक्षा असते. सामना कुठेही असो, प्रेक्षागृह भरलेले असते. पण शनिवारी आशिया कपमधल्या भारत विरुद्ध पाकिस्तान वेगळेच धक्कादायक दृश्य बघायला मिळाले.
कारण बरेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने अनुभवले, पण इतकी कमी गर्दी कधीच बघितली नाही. पल्लिकेले स्टेडियमवर प्रेक्षागृह खचाखच न भरलेले बघून धक्का बसला. आशिया कपमधील सर्वात लक्षणीय सामन्याच्या वेळी जेमतेम ५०% प्रेक्षागृह भरलेले दिसले.
चारही बाजूंनी डोंगरांच्या कुशीत वसलेले पल्लिकेले स्टेडियम प्रेक्षकांना वेगळा आनंद देते. या मैदानावर २०% प्रेक्षक खुर्चीवर बसून सामना बघतात. बाकीचे मैदानात दोनही बाजूंना असणाऱ्या उताराच्या टेकडीवर बसून सामन्याचा आनंद घेतात.
सामान्य प्रेक्षकांना या जागेवरून सामना बघणे आवडते आणि परवडतेही. कारण गवताच्या टेकड्यांवर बसून सामना बघायचा नेहमीचा तिकीट दर ३०० श्रीलंकन रुपये असतो. भयानक बाब म्हणजे आशिया कपमधील सामन्यासाठी याच गवताच्या टेकडीवरच्या तिकिटाचा दर ९६०० श्रीलंकन रुपये ठेवला गेला होता.
पॅव्हेलीयनच्या बाजूला असलेल्या ग्रँड स्टँडमधल्या खुर्चीवर बसून सामना बघायचा झाल्यास नेहमी २००० ते ४००० रुपये मोजावे लागतात. आशिया कपसाठी हाच दर ४० हजार श्रीलंकन रुपये ठेवला गेला. ग्रँड स्टँडमधल्या अजून चांगल्या सोयीच्या तिकिटाचा दर तब्बल ९६ हजार ठेवला गेला. हे सर्व तिकीट दर प्रचंड महाग असल्याने स्थानिक लोकांनी सामन्याकडे पाठ फिरली.
ही चूक श्रीलंकन क्रिकेट मंडळाची नसून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यजमान नात्याने हे दर ठरवले असल्याचे समजले. पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटले की, तिकीट दर काहीही ठेवले तरी भारतीय प्रेक्षक सामन्याला गर्दी करतील. भारतीय प्रेक्षक उत्साहाने आले आणि त्यांनी तिकीट दर जास्त असूनही सामन्याला हजेरी लावली, पण त्याची टक्केवारी कमी असल्याने मोठी घटना झाली.
स्थानिक प्रेक्षकांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ठेवलेला दर अजिबात परवडणारा नसल्याने त्यांनी सामन्याच्या तिकिटाला हात घातला नाही. परिणामी भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीला बरेच प्रेक्षागृह रिकामे राहिले. ज्याला श्रीलंकन बोर्ड नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कारणीभूत असल्याचे समजले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.