Asia Cup Pakistan Squad : भारतीय गोलंदाजांची धुलाई करणाऱ्याला मिळालं बक्षीस... आशिया कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा

Asia Cup 2023 Pakistan Squad
Asia Cup 2023 Pakistan Squad esakal
Updated on

Asia Cup 2023 Pakistan Squad : पाकिस्तानने आशिया कपसाठीचा आपला 17 खेळाडूंचा संघ आज जाहीर केला. या संघात पाकिस्तानने अनेक दिग्गज खेळाडूंना नारळ दिला असून युवा खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवला आहे. इमर्जिंग एशिया कप फायनलमध्ये भारताविरूद्ध शतकी खेळी करणाऱ्या फलंदाजाला संधी मिळाली आहे.

तैयब ताहीरने (Tayyab Tahir) भारताविरूद्धच्या फायनल सामन्यात 66 चेंडूत शथकी खेळी केली होती. त्याला आशिया कपसाठी पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. तर शान मसूदला मात्र संघातील आपले स्थान गमवावे लागले.

Asia Cup 2023 Pakistan Squad
World Cup 2023 Tickets : वर्ल्डकप सामन्यांसाठी तिकीट बूक करणार आहात... ही बातमी तुमच्यासाठी

इमर्जिंग आशिया कप 2023 मध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. एक वेश अशी होती की भारतीय संघाची स्थीत मजबूत होती. पाकिस्तानची अवस्था 5 बाद 187 अशी झाली होती. मात्र त्यानंतर तैयब्ब ताहीरने फक्त 66 चेंडूत शतकी खेळी करत पाकिस्तानला 352 धावांपर्यंत पोहचवले होते.

30 वर्षाचा हा तैयब ताहीर आता 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी पाकिस्तान संघात निवडला गेला आहे. त्याच्या शतकी खेळीची त्याला बक्षिसी मिळाली आहे. ताहीरला पाकिस्तानकडून अद्याप एकही वनडे सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने पाकिस्तान सुपर लीगनंतर अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेत पदार्पण केलं. 3 सामन्यांच्या मालिकेत त्याने 39 धावा केल्या.

Asia Cup 2023 Pakistan Squad
World Cup 2023 BCCI : बीसीसीआय सर्वात अकार्यक्षम... आयसीसीसह अनेक क्रिकेट संघटना जाम भडकल्या

मधल्या फळीतील तैयब ताहीरचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील रेकॉर्ड चांगले आहे. त्याने आतापर्यंत 53 सामने खेळले आहेत. त्यात 44 च्या सरासरी आणि 91 च्या स्ट्राईक रेटने 2300 धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 169 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. त्याच्या नावावर 4 शतके आणि 16 अर्धशतके आहेत.

आशिया कपसाठीचा पाकिस्तान संघ :

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (विकेटकिपर), अब्दुल्ला शफिक, फहीम अशरफ, हारिस रऊफ, इफ्तिकार अहमद, इमाम - उल - हक, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम ज्यूनियर, नसीम शाह, सलमान अली आगा, शाहीन अफ्रिदी, तैयब ताहीर, उस्मा मीर.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.