PAK vs SL Rain : नाणेफेकीसही उशीर, बाबरला भर पावसातही फुटला घाम; सामना रद्द झाल्यास कोण खेळणार फायनल?

PAK vs SL Rain
PAK vs SL Rainesakal
Updated on

PAK vs SL Rain : आशिया कपमधील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर 4 चा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आशिया कपची फायनल खेळण्यासाठी दोन्ही संघांना विजय गरजेचा आहे. मात्र नाणेफेकीपूर्वीत कोलंबोमध्ये तुफान पाऊस सुरू झाल्याने दोन्ही संघ पॅव्हेलिनयमध्येच बसून आहेत. पावसाचा जोर पाहता सामना लवकर सुरू होण्याची शक्यता नाही.

जरी दोन्ही संघांना विजय गरजेचा असला तरी पाऊस सर्वात जास्त नुकसान हे पाकिस्तानचं करणार आहे. कारण भारताविरूद्ध पाकिस्तानचा 228 धावांनी दारूण पराभव झाल्याने त्यांचे नेट रनरेट कोलमडले आहे. याचा फायदा श्रीलंकेला होऊ शकतो. त्यामुळे बाबर सेना पाऊस जाण्यासाठी प्रार्थना कतेय.

PAK vs SL Rain
ODI Ranking Team India : भारतीय संघ वनडे रँकिंगमध्ये होऊ शकतो नंबर 1... रोहित सेनेला पेलावं लागणार शिवधनुष्य

पाऊस देणार गतविजेत्यांना हात?

यंदाच्या आशिया कपमध्ये पावसाने सातत्याने व्यत्यय आणला आहे. कोलंबो येथील प्रत्येक सामन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना रद्द झाला तर दुसरा सामना राखीव दिवशी खेळवावा लागला.

या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 228 धावांनी मोठा पराभव केला. भारताविरूद्ध मोठा पराभव झाल्याने त्यांचे नेट रनरेट हे उणे 1.892 असून श्रीलंकेचे नेट रनरेट हे उणे 0.200 इतके आहे. आता पाकिस्तानला फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी सामना जिंकणे अत्यंत गरजेचे आहे.

आशिया कपच्या सुपर 4 फेरीत दोन्ही संघांनी दोन - दोन सामने खेळले असून त्यातील प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. जर पाऊस झाला आणि सामना रद्द करावा लागला तर सरस नेट रनरेटच्या आधारावर श्रीलंका फायनलमध्ये पोहचेल. पाकिस्तानला जर भारतासोबत फायनल खेळायची असेल तर त्यांना सामना जिंकणे हा एकमेव पर्याय आहे.

PAK vs SL Rain
Shreyas Iyer IND vs BAN : बांगलादेश सामन्यापूर्वीच श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर आली मोठी अपडेट

कोलंबो येथील पावसाबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेकीपूर्वीच पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला आहे. आशिया कपमधील सामन्यात पडलेला पाऊस आणि आज पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यापूर्वीच सुरू झालेला पाऊस याची तुलना केली तर आजच्या सामन्यापूर्वी पडत असलेला पाऊस हा जास्त तीव्र आहे.

पाऊस असाच सुरू राहिला तर सामन्याची षटके घटवण्यास 4.30 वाजता सुरूवात केली जाईल. सामना प्रत्येकी 20 - 20 षटकांचा खेळवण्यात येऊ शकतो का याबाबतचा निर्णय देखील रात्री 9 वाजता घेण्यात येईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.