Asia Cup 2023 : IPL दुबईत भारत-पाक सामना का नाही? PCBच्या माजी प्रमुखाने जय शहावर केले गंभीर आरोप

Asia Cup 2023 PCB chief Najam Sethi
Asia Cup 2023 PCB chief Najam Sethiesakal
Updated on

Asia Cup 2023 PCB chief Najam Sethi : आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर पीसीबीचे माजी प्रमुख नजम सेठी संतापले. आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाबाबत बैठकीच्या वेळी ते पीसीबीचे अध्यक्ष होते. आता त्याने आशियाई क्रिकेट परिषदेवर गंभीर आरोप केले आहेत.

Asia Cup 2023 PCB chief Najam Sethi
IND vs PAK: 'हा कोणता शॉट...', पाकिस्तानविरुद्ध विराट कोहली आऊट झाल्यानंतर गौतम गंभीर संतापला

पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, “हे खूपच निराशाजनक आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले. पण पीसीबी चेअरमन होतो त्यावेळी मी ACC ला UAE मध्ये खेळण्याची विनंती केली होती, पण दुबईमध्ये खूप गरम आहे. पण जेव्हा सप्टेंबर 2022 मध्ये आशिया कप खेळला गेला तेव्हा आणि एप्रिल 2014 आणि सप्टेंबर 2020 मध्ये जेव्हा आयपीएल खेळला गेला तेव्हा येथील हवामान तितकेच गरम होते. खेळातील राजकारण अक्षम्य आहे.

Asia Cup 2023 PCB chief Najam Sethi
Team India : पाकिस्तानविरुद्ध इशान किशनचं दमदार अर्धशतक, KL राहुलचा पत्ता कट?

आशिया कपचा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. कॅंडीच्या पल्लेकेले स्टेडियमवर हा सामना झाला. शनिवारी सामन्यापूर्वीच पावसाची शक्यता होती. भारताचा डाव संपल्यानंतरही पाऊस सुरूच राहिला आणि सामना रद्द करण्यात आला.

पाकिस्तान आशिया कपचे यजमान आहे आणि तेथेही काही सामने होणार आहेत. श्रीलंकेतही हायब्रीड मॉडेल अंतर्गत स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. भारताचे सर्व सामने श्रीलंकेच्या भूमीवर होणार आहेत. इतर संघांनाही पाकिस्तानात खेळायचे आहे. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.

बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि एसीसी ही आशिया चषक स्पर्धा आयोजित करणारी आहे. अशा स्थितीत जय शहा यांच्यावर सेठींचे आरोप दिसून येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()