Asia Cup 2023 : आशिया कपचे उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये हलवणार? PCBचे नवे पाऊल, जय शहांना केले आवाहन

Asia Cup 2023
Asia Cup 2023
Updated on

Asia Cup 2023 Shift To Pakistan : आशिया कप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अ गटातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्याचवेळी कोलंबो श्रीलंकेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुपर-4 सामनेही रद्द होण्याचा धोका आहे.

अशा परिस्थितीत एकीकडे सामने डंबुला येथे हलवण्याच्या बातम्या येत असताना दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांना स्पर्धेचे उर्वरित सामने पाकिस्तान हलवण्याची आवाहन केले आहे.

Asia Cup 2023
Asia Cup 2023 : 5 महिन्यांनंतर टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये दिग्गज खेळाडूची एन्ट्री! कोणाचा पत्ता झाला कट?

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झका अश्रफ यांनी एसीसी अध्यक्ष जय शाह यांना श्रीलंकेतील खराब हवामान पाहता आशिया कप 2023 चे उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये हलवण्याची सूचना केली आहे. कोलंबोमध्ये हे सामने 9 सप्टेंबरपासून खेळवले जातील आणि त्यानंतर फायनलही तिथे खेळवण्यात येईल.

कँडी येथे भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला, जिथे भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर पावसामुळे सामना झाला नाही. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Asia Cup 2023
India vs Nepal Asia Cup: सामना न खेळता टीम इंडिया सुपर-4 मध्ये? कँडीतून मिळाले संकेत, जाणून घ्या गणित

यापूर्वी पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनीही पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना रद्द झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याने लिहिले की, किती निराशाजनक पावसाने क्रिकेटचा सर्वात मोठा सामना खराब केला. PCB चे अध्यक्ष या नात्याने मी आशियाई क्रिकेट परिषदेला UAE मध्ये खेळण्याची विनंती केली होती, परंतु श्रीलंकेत यजमानपदासाठी युक्तिवाद करण्यात आला. असे म्हटले जाते की दुबईचे हवामान अत्यंत उष्ण असेल परंतु शेवटच्या वेळी सप्टेंबर 2022 मध्ये जेव्हा तेथे आशिया कप खेळला गेला तेव्हा ते तितकेच गरम होते किंवा आयपीएल 2020 मध्येही असेच होते. खेळात राजकारण करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.