Rohit Sharma : आशिया कप जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या वक्तव्याने वर्ल्डकप आधी टीम इंडियाचे वाढले टेन्शन!

Asia Cup 2023 Rohit Sharma
Asia Cup 2023 Rohit Sharma
Updated on

Asia Cup 2023 Rohit Sharma : पाच वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आणि आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली.

कोलंबोतील या विजयाने वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाच्या तयारीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे आणि आशा उंचावल्या आहेत. पण या दरम्यान रोहित शर्माच्या वक्तव्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. त्याने श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या दोघांच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले आहे.

Asia Cup 2023 Rohit Sharma
M. Siraj:खेळाडू असावा तर असा! सामनाही जिंकला अन् मनही... मोहम्मद सिराजने मॅन ऑफ द मॅचची रक्कम कोणाला केली समर्पित?

रविवारी 17 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यात मोहम्मद सिराजसह आपल्या वेगवान गोलंदाजांच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेला अवघ्या 50 धावांत गुंडाळले होते. यानंतर शुभमन गिल आणि इशान किशन यांनी अवघ्या 6.1 षटकांत लक्ष्य गाठून संघाला चॅम्पियन बनवले. या विजयातही टीम इंडियासाठी आगामी दिवसांचे टेन्शन कायम आहे. कारण आहे अक्षर पटेलची दुखापत.

Asia Cup 2023 Rohit Sharma
Rohit Sharma : या स्पर्धेत आम्ही सर्व काही... आशिया कपच्या विजयानंतर कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना

श्रेयस अय्यरच्या पाठदुखीने टीम इंडिया आधीच टेन्शनमध्ये आहे. यानंतर डावखुरा फिरकी-अष्टपैलू अक्षर पटेल बांगलादेशविरुद्ध दुखापतग्रस्त झाला, त्यामुळे तो अंतिम फेरीत खेळू शकला नाही. जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहितने दोघांच्या दुखापतींची माहिती दिली. रोहितने सांगितले की त्याला हॅमस्ट्रिंग इंज्युरी झाली आहे, ज्यामुळे तो कदाचित एक आठवडा किंवा 10 दिवस बाहेर असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणे अक्षरसाठी कठीण असल्याचेही रोहितने सांगितले.

यासोबतच रोहितने श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबतही अपडेट दिले आणि सांगितले की, तो जवळजवळ बरा झाला आहे आणि तो एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त असेल. वर्ल्ड कपपूर्वी होणारी ही एकदिवसीय मालिका 22 सप्टेंबरपासून सुरू होणार असून ती 27 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.