Asia Cup Ind vs Pak : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा होणार सामना? जाणुन घ्या कसे

India vs Pakistan Asia Cup 2023
India vs Pakistan Asia Cup 2023sakal
Updated on

Asia Cup 2023 Schedule India vs Pakistan : क्रिकेट चाहते ज्याची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते ते आता संपले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप 2023च्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही स्पर्धा 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळली जाणार आहे.

त्यामुळे भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षाही संपली आहे. हे दोन संघ एकतर आयसीसी स्पर्धेत किंवा आशिया कप स्पर्धेत खेळतात. आशिया कप स्पर्धेत दोन्ही संघ बलाढ्य संघ म्हणून उतरतील. पण या आशिया कप मध्ये हे दोन्ही संघांमध्ये तीन सामने खेळवले जाऊ शकतात.

India vs Pakistan Asia Cup 2023
Ishan Kishan : सिलेक्टर करणार होते कर्णधार, खेळण्यास दिला नकार आता इंडिजविरुद्धच्या मालिकेतूनही जाणार बाहेर?

आशिया कप स्पर्धेचे स्वरूप पाहिल्यास सहा सहभागी संघ प्रत्येकी दोन गटात विभागले जातील. एकूण 13 सामने खेळले जातील त्यापैकी चार सामने पाकिस्तानमध्ये आणि नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत.

या आशिया कप मध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना जवळपास निश्चित आहे. मात्र पीसीबीने पूर्ण वेळापत्रक जाहीर केले नसून केवळ तारखा दिल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवल्यास या दोन संघांमधील सामना निश्चित आहे.

साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील दोन संघ सुपर-4 टप्प्यात जातील आणि या टप्प्यातील टॉप-2 संघ फायनल खेळतील. जर भारत आणि पाकिस्तानचे संघ एकाच गटात राहिले तर एक सामना होईल. यानंतर जर दोन्ही संघ सुपर-4 मध्ये आले तर दोन्ही संघ पुन्हा एकदा लढतील.

India vs Pakistan Asia Cup 2023
Asia Cup Schedule 2023: आशिया कपचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानला फक्त 4 सामने, श्रीलंकेत होणार स्पर्धा

गेल्या आशिया कपच्या वेळापत्रकानुसार सुपर-4 मध्ये पोहोचणारा संघ प्रत्येक संघाशी सामने खेळतो. म्हणजेच जर भारत आणि पाकिस्तान सुपर-4 मध्ये आले तर येथे एक सामना फिक्स होतो. यानंतर हे दोन्ही संघ टॉप-2 मध्ये राहिल्यास ते अंतिम फेरीत पोहोचतील आणि अशा प्रकारे हे संघ या आशिया कपमध्ये तिसऱ्यांदा आमनेसामने येतील.

गेल्या वेळी भारताला आशिया कपची अंतिम फेरी गाठता आली नव्हती. हा संघ सुपर-4 मधूनच बाहेर पडला होता. यावेळी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत हा आशिया चषक नावावर करायचा आहे.

या आशिया कपपासून भारत आणि इतर सर्व संघ यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी तयारी करतील. गतवर्षी बाबर आझमच्या नेतृत्वाखाली या संघाने अंतिम फेरी गाठली होती, पण श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.