Asia Cup 2023 IND vs PAK : पाकिस्तान यजमान असून नसल्यासारखे! जय शहांची वेळापत्रक जाहीर करताना मोठी खेळी?

Asia Cup 2023 IND vs PAK
Asia Cup 2023 IND vs PAK esakal
Updated on

Asia Cup 2023 IND vs PAK : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा आशिया कप 2023 चा अधिकृत यजमान आहे. मात्र भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्याने आशिया कपचे फक्त 4 सामने पाकिस्तानात आणि उर्वरित सामने हे श्रीलंकेत होणार आहे. नुकतेच एशियन क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष जय शहा यांनी आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले.

आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खुसपट काढण्याचे बंद करेल असे वाटले होते. मात्र पीसीबीने वेळापत्रक जाहीर करण्याच्या टायमिंगवरून आदळआपट करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याविरूद्ध नाराजी व्यक्त केली आहे. (Asia Cup 2023 Schedule)

Asia Cup 2023 IND vs PAK
WC 2023: देसी जुगाड! Ind vs Pak सामन्यासाठी हॉटेल्स महाग झाले तर थेट हॉस्पिटलमध्ये बेडच केले बुक...

वेळ साधली?

झालं असं की आशिया कपचे वेळापत्रक हे बुधवारी सायंकाळी ट्रॉफीच्या अनावरणासह 7 वाजून 15 मिनिटांनी होणार आहे असे पीसीबीकडून सांगण्यात आले होते. भारतीय वेळेनुसार हे वेळापत्रक सायंकाळी 7.45 ला जाहीर होणार होते. मात्र बीसीसीआय सचिव आणि एशियन क्रिकेट काऊन्सीलचे अध्यक्ष जय शहा (Jay Shah News) यांनी लाहोरमधील अनावरणाच्या अधिकृत वेळेपूर्वीच वेळापत्रक प्रसिद्ध केले.

जय शहा यांनी ट्विटवरून आशिया कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली. यामुळे सर्वात आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर करण्याचा त्यांचा हक्का हिरावून घेतला. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.

पीसीबीच्या कार्यक्रमाचा झाला पचका

पीसीबीने बुधवारी आशिया कप ट्रॉफीचे अनावरण आणि वेळापत्रक जाहीर करण्यासाठी एका कार्यक्रमाचं लाहोर येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पाकिस्तानचे माजी खेळाडू आणि जका अशरफ यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट संघटनचे पदाधिकारी सामील झाले होते.

मात्र या कार्यक्रमाच्या अर्धा तास आधीच जय शहा यांनी सोशल मीडियावरून वेळापत्रक जाहीर केले. या प्रकरणावर पीसीबीच्या (Pakistan Cricket Board) एका सूत्राने सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एसीसीला कल्पना दिली होती की लाहोरमधील कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांनी आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

मात्र 7.15 मिनिटांनी सुरू होणाऱ्या कार्यक्रमाच्या अर्धा तास आधी जय शहा यांनी सोशल मीडियावरून वेळापत्रक जाहीर केले.

Asia Cup 2023 IND vs PAK
Sl vs Pak Babar Azam: गजब बेइज्जती! श्रीलंकेने बाबरचा केला पोपट, आधी केला अपमान अन् नंतर...

पीसीबीने व्यक्त केली नाराजी

पीसीबीच्या सूत्रांनी सांगितले की जय शहांच्या या खेळीमुळे पीसीबीच्या कार्यक्रमाचे महत्वच संपले. पीसीबीने याबाबत एसीसीकडे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र एसीसीने हे सर्व एका गैरसमजातून झाले आहे असे सांगितले.

एसीसीने सांगितले की वेळेच्या फरकामुळे हा गैरसमज झाला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वेळेत अर्ध्या तासाचा फरक आहे. त्यामुळे जय शहांनी केलेल्या घोषणेमुळे पीसीबीला आश्चर्य वाटले.

आशिया कपची सुरूवात 30 ऑगस्टपासून होणार आहे. यातील पहिला सामना हा पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होईल. भारत आणि पाकिस्तान हे 2 सप्टेंबरला एकमेकांना भिडणार आहेत. हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथील मैदानावर होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.