Asia Cup 2023 Schedule : पाकिस्तान आता पैशासाठी हटलं! आशिया कप वेळापत्रकाचं घोडं PCB मुळं अडलं

Asia Cup 2023 Schedule
Asia Cup 2023 Scheduleesakal
Updated on

Asia Cup 2023 Schedule : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप आयोजनावरून सुरू असलेला वाद काही केल्या शमन्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket News) जरी हायब्रीड मॉडेलसाठी मान्य झालं असलं तरी आता त्यांना पैशाची हाव सुटली आहे.

त्यांनी श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कपच्या सामन्यांमधील उत्पन्नाचा अधिक वाटा मागितला आहे. युएईने गेल्या वर्षी आशिया कप आयोजनावेळी जेवढा बीसीसीआयआला (BCCI) उत्पन्नातील वाटा दिला होता. तेवढाच वाटा श्रीलंकेने पाकिस्तानला द्यावा अशी मागणी केली आहे.

Asia Cup 2023 Schedule
Stone Pelting on Pakistan Team:भारतात चक्क आमच्यावर दगडफेक झाली होती, आफ्रिदीचा खळबळजनक दावा

एशियन क्रिकेट काऊन्सीलने रविवारी आणि सोमवारी दुबई येथे दोन दिवसांची बैठक बोलवली आहे. यात आशिया कप 2023 चे पूर्ण वेळापत्रक फायनल केलं जाणार आहे.

पाकिस्तान जरी आशिया कप 2023 चा मूळ आयोजक असला तरी त्यांना फक्त त्यांच्या वाट्याला फक्त 4 सामनेच आले आहेत. श्रीलंका या स्पर्धेतील 9 सामने आयोजित करणार आहे. याचबरोबर अंतिम सामना आणि भारत - पाकिस्तान यांच्यातील दंबुला येथील दोन सामने देखील श्रीलंकेतच होणार आहेत. (Asia Cup 2023 News)

भारत - पाकिस्तान सामने हे सर्वाधिक जास्त उत्पन्न मिळवून देतात. त्यामुळे पाकिस्तान हा अधिक पैसे मिळावे यासाठी हटला आहे. पीसीबीमधील सूत्रांनी द न्यूजला दिलेल्या माहितीनुसार,

'पाकिस्तान आशिया कपचा आयोजक म्हणून फक्त काही सामनेच आयोजित करणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. तर उर्वरित सामने हे श्रीलंकेत होणार आहेत. पाकिस्तानला श्रीलंकेत आयोजित होणाऱ्या सामन्यांमधून किती रक्कम मिळणार हे सर्वात महत्वाचे आहे.'

Asia Cup 2023 Schedule
Rinku Singh : टीम इंडियाचे दार उघडल्यावर रिंकूने दिली एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...

आशिया कपचे वेळापत्रक घोषित होण्यासाठी वेळ का लागतोय?

- पीसीबी ठरलेल्या वेळापत्रकावर पुन्हा काम करण्याची मागणी करतोय.

- सध्याच्या घडीला पाकिस्तान फक्त 4 आशिया कपचे सामने आयोजित करणार आहे.

- श्रीलंकेत पाऊस पडण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान 4 पेक्षा जास्त सामने आयोजित करण्यास मिळावेत अशी मागणी करतोय.

- पाकिस्तानला श्रीलंकेत आयोजित होणाऱ्या सामन्यांमधून उत्पन्नाचा जास्त वाटा हवा आहे.

- जर सामने युएईमध्ये झाले तर पीसीबी जास्त कमवू शकतो.

- श्रीलंका 9 सामने आयोजित करणार आहे. पीसीबीला प्रत्येक सामन्यात बीसीसीआयला मिळतो तेवढा उत्पन्नाचा वाटा हवा आहे.

- पीसीबी अधिकारी आणि एसीसी अधिकारी हे रविवार आणि सोमवारी दुबईत भेटणार आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.