Asia Cup 2023 : आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत! नेपाळविरुद्धच्या सामन्यात अचानक गेला मैदानाबाहेर

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी आफ्रिदीच्या दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत!
shaheen afridi
shaheen afridiesakal
Updated on

Asia Cup 2023 Shaheen Afridi Injury : आशिया कप 2023 च्या भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीने यजमान संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. नेपाळविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने शामदार गोलंदाजी केली, मात्र अवघ्या 5 षटकांनंतर त्याने मैदान सोडले.

यावेळी त्याच्यासोबत पाकिस्तान संघाचे फिजिओ आणि डॉक्टर मैदानाबाहेर उपस्थित होते. काही वेळाने तो मैदानात परतला असला तरी त्याने गोलंदाजी केली नाही. अवघ्या तीन दिवसांवर भारताविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी आफ्रिदीसारख्या महत्त्वाच्या खेळाडूला झालेली दुखापतीमुळे पाकिस्तान चिंतेत आला आहे.

shaheen afridi
Sachin Tendulkar : 'ती' जाहिरात केली असती तर घरी जाऊ शकलो नसतो; सचिनने सांगितला शारजातील इनिंगनंतरचा किस्सा

शाहीन आफ्रिदीच्या दुखापतीवर माजी पाकिस्तानी गोलंदाज वकार युनूस म्हणाला की, 'थर्ड मॅन किंवा अंतिम टप्प्यावर फिजिओ वेगवान गोलंदाजांसोबत उभे असल्यास मला हरकत नाही. पण डॉक्टर आल्यावर थोडी चिंता वाढते. दोघेही शाहीनच्या आसपास होते. त्याला काय अडचण असेल तर त्याने ती लवकर दूर करावी. पाकिस्तानसाठी तो एक मौल्यवान संपत्ती आहे. शाहीन आफ्रिदीने नेपाळविरुद्ध गोलंदाजीची सुरुवात केली आणि पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. त्याने 5 षटकात 27 धावा दिल्या.

shaheen afridi
Asia Cup 2023: इशान किशनसाठी कोण देणार बलिदान? रोहित धर्म संकटात, गिल अन् कोहलीच्या जागी टांगती तलवार

पाकिस्तान विरुद्ध नेपाळ सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानसमोर नेपाळचे आव्हान होते. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 50 षटकांत 6 बाद 342 धावा केल्या. त्याच्याकडून बाबर आझमने 151 आणि इफ्तिखार अहमदने नाबाद 109 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ 104 धावांवर गारद झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.