Sachithra Senanayake arrested over match-fixing accusations : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायकेला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली बुधवारी अटक करण्यात आली आहे. श्रीलंकेसाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळलेल्या सेनानायकेवर 2020 मध्ये लंका प्रीमियर लीग दरम्यान मॅच फिक्सिंगचा प्रयत्न केल्याचा आरोप होता.
सचित्रने दोन खेळाडूंना सामना फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने सेनानायकेला तीन आठवड्यांपूर्वी परदेशात जाण्यास बंदी घातली होती.
सचित्रा सेनानायके याने मॅच फिक्सिंगबाबत आपल्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सेनानायकेने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने श्रीलंकेसाठी 49 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.35 च्या सरासरीने 53 बळी घेतले. दुसरीकडे सेनानायकेने 24 टी-20 सामने खेळताना 25 विकेट घेतल्या आणि त्याला श्रीलंकेकडून 1 कसोटी सामन्यात खेळण्याची संधीही मिळाली.
2014 मध्ये जेव्हा श्रीलंकेने भारताविरुद्ध टी-20 विश्वचषक फायनल जिंकली तेव्हा सेनानायके देखील त्या संघाचा एक भाग होता. सेनानायकेने त्या विश्वचषकात 6 सामन्यात केवळ 4 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत संशयास्पद गोलंदाजी कृतीमुळे काही महिन्यांच्या बंदीलाही सामोरे जावे लागले आहे. सेनानायके हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा देखील भाग होता आणि त्याने 8 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.