Asia Cup 2023 Team India: वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची नाचक्की, नकोसा विक्रम केला नावावर

Team India
Team Indiasakal
Updated on

Asia Cup 2023 Team India : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडियाची फलंदाजी पाकिस्तानविरुद्ध फ्लॉप ठरली आणि दुसऱ्या सामन्यात नेपाळविरुद्धच्या क्षेत्ररक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने एक, दोन नव्हे तर तीन झेल सोडले. मोठी गोष्ट म्हणजे जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानल्या जाणार्‍या खेळाडूंनीही झेल सोडले.

पहिला झेल श्रेयस अय्यरने. दुसरा झेल विराट कोहलीने आणि तिसरा झेल यष्टिरक्षक इशान किशनने सोडला. नेपाळविरुद्ध जेव्हा हे झेल सोडले जात होते, त्याच वेळी एक आकडेवारी समोर आली. ज्यामुळे वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची नाचक्की झाली. भारताच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.

Team India
World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी दिग्गज गौतम गंभीरने केली भारतीय संघाची निवड! श्रेयस अय्यर वगळले तर...

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, टीम इंडियाची झेल घेण्याची आकडेवारी खूपच खराब आहे. एका आकडेवारीनुसार, 2019 च्या वर्ल्ड कपनंतर भारतीय खेळाडूंची झेल घेण्याची क्षमता केवळ 75.1 टक्के आहे. टीम इंडियापेक्षा फक्त अफगाणिस्तानचा आकडा वाईट आहे, ज्याने 71.2 टक्के झेल सोडले आहेत. टॉप 10 संघांमध्ये भारतीय संघ झेल सोडण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Team India
Asia Cup 2023 : "अरे चाललंय तरी काय..." चालू सामन्यात इशान किशनवर संतापला कर्णधार रोहित

इंग्लंड संघातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक झेल घेण्याची क्षमता आहे. त्याचे खेळाडू 82.8 टक्के झेल घेतात. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे ज्याने 81.6 टक्के पकडले आहेत. न्यूझीलंड संघ 80 टक्के झेल घेतो. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेची झेल घेण्याची क्षमताही टीम इंडियापेक्षा चांगली आहे. हा आकडा टीम इंडियासाठी खऱच चांगला नाही. कारण पुढच्या महिन्यात वर्ल्ड कप आहे आणि जर रोहित आणि कंपनीची फिल्डिंग अशीच राहिली तर तुम्ही वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.