Asia Cup 2023 : मोठी अपडेट! आशिया कप 2023 साठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा

Asia Cup 2023 Team India Squad
Asia Cup 2023 Team India Squadsakal
Updated on

Asia Cup 2023 Team India Squad : आशिया कप 2023 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या यजमानपदी खेळला जाणार आहे. या स्पर्धेत 6 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळचा संघ सहभागी होणार आहे. आतापर्यंत 15 आवृत्त्यांमध्ये भारताने सर्वाधिक 7 वेळा विजेतेपद पटकावले आहे.

भारतानंतर सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने 6 वेळा जेतेपदावर कब्जा केला आहे. या वर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या एकदिवसीय विश्वचषकामुळे आशिया चषक 2023 देखील एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाईल.

Asia Cup 2023 Team India Squad
IPL 2024 : RCB संघात मोठा बदल, लखनऊ सुपर जायंट्सच्या दिग्गज खेळाडूची बंगळुरूमध्ये एंट्री

आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार याबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि निवडकर्ते सोमवारी आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करतील. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती सोमवारी आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. टीम इंडियाला मधल्या फळीतील दोन सर्वात फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुलची उणीव भासत आहे. केएल राहुल 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक असणार आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, 'श्रेयस अय्यर आणि केएल राहुल 80 टक्के तंदुरुस्त आहेत, परंतु अद्याप पूर्णपणे फिट झालेले नाहीत. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची भेट घेऊन आशिया कप स्पर्धेच्या योजनांबाबत चर्चा केली. भारतीय संघ व्यवस्थापनाने सध्या वनडे फॉरमॅटमध्ये संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांना अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्हाला आशा आहे की श्रेयस अय्यर आणि केएल राहुल दोघेही 2023च्या विश्वचषकापर्यंत फिट होतील. आम्ही श्रेयस अय्यर आणि केएल राहुलच्या पुनरागमनाची घाई करणार नाही. केएल राहुलला बरे होण्यासाठी 3 आठवडे लागतील. आशिया कप 2023 चे सामने लाहोर, मुलतान, कोलंबो आणि कॅंडी येथे खेळवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.